अपघातात दोघे ठार

जळगावजवळ दूरदर्शन टॉवरनजीक घडली घटना
अपघातात दोघे ठार
मयत - परवेज खाटीक , आमीर खाटीक

जळगाव । Jalgaon

बर्‍हाणपुर (Barnahanpur) येथून जळगावकडे दुचाकीने येत असतांना अज्ञात वाहनाने (unknown vehicle) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात (accident) परवेर निसार खाटीक (वय-22, रा.लक्ष्मीनगर) व आमिर जाकीर खाटीक (वय- 23, रा. उस्मानिया पार्क) या दोघ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुरदर्शन टॉवर जवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील परवेज खाटीक व आमिर खाटीक हे आतेभाऊ मामेभाऊ आहेत. परवेचे गेल्या महिन्यात लग्न झाले असून तो आज आमिर सोबत बर्‍हाणपुर (Barnahanpur) येथे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. सायंकाळी बर्‍हाणपूर येथून जळगावला येत असतांना त्याच्या (एमएच 19 सीएच 6059) क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, या अपघातात परवेज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील व रिजवाण, इकबाल व इम्रान असा परिवार आहे.

जखमी आमिरने दिली अपघाताची माहिती

अपघाता आमिरच्या पोटातील आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान त्याने तशाच अवस्थेत आपल्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी त्यांना रुग्णावाहिकेत (ambulance) टाकून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत

आमिर याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात वडील जाकीर, आई निलोफर, अमान व अबुराज असा परिवार आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

घटनेची माहिती मिळताच दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. आमिर हा परवेजच्या आताच्या मुलगा आहे. अपघातात आतेभाऊ मामेभाऊंचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता.

पंधरा दिवसांपुर्वी टाकले गॅरेज

परवेज हा भाजीपाला विक्री (Vegetable sales) करुन कुटुंबाला हातभार लावत होता. तर आमिर याने ममुराबाद रोडवर गेल्या पंधरा दिवसांपुर्वीच मोटारसायकल दुरुस्तीचे गॅरेज (Motorcycle repair garage) टाकले होते.

Related Stories

No stories found.