
जळगाव - jalgaon
आपण वनस्पतीचे गार्डन (Garden) पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा (garden of books) साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष !
आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
तीन गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा
शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण गार्डनमधे विविध प्रकारचे पुस्तक उपलध्द असणार आहेत. ठिकठिकाणी पुस्तकांचे बाॅक्स आहेत. पुस्तक वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधले आहेत. बगीच्यात पुर्णत: निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गार्डन मधे प्रत्येक मोठ्या झाडाखाली पुस्तकाचा बॉक्स आहेत. तेथून पुस्तक काढून तुम्हांला ते झाडाखाली बांधण्यात आलेल्या ओट्यावर बसून पुस्तक वाचता येणार आहे.