
बोदवड - प्रतिनिधी Bodwad
बोदवड शहरातील अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या, मलकापूर चौफुली येथून सकाळी पावणेदहा वाजेदरम्यान गंगाराम जगदेव पाटील, (वय :६५, राहणार: मोठा हनुमान मंदिर, बोदवड) हे पायी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ४६ पीएफ ६१३२ या वाहनाखाली आले आणि या अपघातात जागीच ठार झाले.