बोदवडचे तहसील कार्यालय म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा"

बोदवडचे तहसील कार्यालय म्हणजे "असून अडचण नसून खोळंबा"

बोदवड Bodwad प्रतिनिधी

बोदवड तहसील कार्यालयाला (Bodwad tehsil office) कोणी वाली राहीला नाही, त्यामुळे या कार्यालयाची अवस्था म्हणजे असून अडचण (Difficulty) नसून खोळंबा झाली आहे. कर्मचारी (Staff) व अधिकार्‍यांसाठी (officers) वेळेचे बंधन राहीलेले नाही. अनेक कर्मचार्‍यांना कार्यालयात यायला साडे अकरा वाजतात तर काही कर्मचारी जळगांवहून आरामशीर ये-जा करत असल्याने ग्रामीण भागातून (rural areas) येणाऱ्या नागरिकांना (citizens) त्रास (Harassment) होऊ लागला आहे.

तहसीलदार टोम्पे (Tehsildar Tompe) यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक कारवाई (Bribery Prevention Action) झाल्यावर तहसील कार्यालयाचा कारभार (management) पुर्णपणे ढासळला आहे. प्रभारी तहसीलदारांचा (Tehsildar in charge) भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नाही, एकाही नागरीकांना ते फोनवर बोलत नसत. कार्यालयात कधीही यायचे जायचे, त्यामुळे कर्मचारी व अधिकार्‍यांचे फावले. काही कर्मचारी जळगावहून अपडाऊन करतात. काही महीला कर्मचारी साडे अकरा वाजता तहसिल कार्यालयात येताना दिसत आहे. टेबलवर काम करायचे सोडून मोबाईलवर अपडेट (Updates on mobile) राहत असल्याने, ग्रामीण भागातील जनतेला अडचणी येत आहेत, गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे. दरम्यान त्यांना येथे काम करण्यात इन्ट्रेस्ट नसल्याची चर्चा आहे.

वाळू आणि रेशन वाटप आणि लाचखोरी च्या प्रकरणात तहसील कार्यालय बदनाम झाले असून अनेक अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (collector's office) रडारवर (radar) आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात अडचणी (Difficulty) येत आहेत. बॅँक कार्यालयासाठी लागणारी कागदपत्रे तहसील मधून वेळेवर मिळत नसल्याने, कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारच्या सूचनांचे पालन होत नाही. तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. त्यांच्या समस्या (Problem) सोडविण्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचारी नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बोदवड तहसील कार्यालयाचा कारभार सुरुळीत करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः मेडिकल कॉलेज साठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे विद्यार्थी ऑनलाईन अपलोड करीत असतात मात्र गेल्या दोन आठवड्यापासून एकही प्रमाणपत्र तहसील कार्यालयाने मंजूर केले नसल्याने विद्यार्थ्यांना (students) अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

Related Stories

No stories found.