बोदवड : स्टेट बँकेचे ATM फोडले ; ३१ लाख लांबविले

बोदवड : स्टेट बँकेचे ATM  फोडले ; ३१ लाख लांबविले

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

शहरातील मुख्य रवस्त्यावर असलेल्या स्टेट बँक शेजारील (SBI BANK) स्टेट बँकेचे एटीळ (atm) फोडून त्यातील सुमारे ३१ लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

सदर एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केल्याचे दिसून येत आहे. त्यावरून हे चोरटे चांगलेच सराइत असल्याचे बोलले जात आहे.

या एटीएमवर ग्राहकांची नेहमी गर्दी असते, त्यामुळे या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड भरली जाते. मंगळवारच्या रात्री सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधत एटीएमच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरल्याला स्प्रे मारत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. व त्यातील रोख रक्कम 31 लाख १० हजार रूपये लांबलिले. पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com