आठ बाजार समित्यांवरील संचालक मंडळ बरखास्त

प्रशासकांनी घेतला पदभार; सहा महिन्याच्या आत निवडणुका लागणार
आठ बाजार समित्यांवरील संचालक मंडळ बरखास्त

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

कोरोना काळ आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या (various executive co-operative societies) निवडणुकांमुळे (Elections) मुदतवाढ देण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे (Agricultural Produce Market Committees) संचालक मंडळ (Board of Directors ) बरखास्त (Dismissed) करून प्रशासक (Administrator) नियुक्त करण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने (Department of Co-operation and Marketing) दिले होते. त्यानुसार शनिवारी आठही बाजार समित्यांचा प्रशासकांनी पदभार घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कोरोना काळ आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committees) संचालक मंडळाला (Board of Directors) मुदतवाढ देण्यात आली होती. आता मात्र कोरोना परिस्थीती नियंत्रणात असून सोसायट्यांच्या निवडणुकांचा टप्पाही पार पडला आहे. त्यामुळे आणखी मुदतवाढ देता येत नसल्याने राज्याच्या सहकार व पणन विभागाने (Department of Co-operation and Marketing) मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक (Administrator नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील जळगावसह आठही बाजार समित्यांचा प्रशासकांनी शनिवारी पदभार घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

असे आहेत बाजार

समित्यांवरील प्रशासक

जिल्ह्यातील जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, बोदवड आणि पारोळा या बाजार समित्यांवर प्रशासकांनी पदभार घेतला आहे. यात जळगाव बाजार समितीवर सहाय्यक निबंधक विजयसिंग गवळी, भुसावळ आणि जामनेर - सहाय्यक निबंधक जे.बी. बारी, बोदवड - सहकार अधिकारी श्रेणी-1 डी.व्ही.पाटील, चोपडा - सहाय्यक निबंधक के.पी. पाटील, पारोळा - सहाय्यक निबंधक जी. एच. पाटील, रावेर - सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर आणि यावल - सहाय्यक निबंधक संजय गायकवाड यांनी प्रशासकपदाचा पदभार घेतला.

सहा महिन्याच्या आत निवडणूक

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ बाजार समित्यांचा प्रशासकांनी पदभार घेतल्याची प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. आता सहा महिन्यांच्या आत या आठही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक (Elections) घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.

... तर स्वतंत्र पॅनल देणार- लक्ष्मण पाटील जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरूवातीला भाजपा-शिवसेना पॅनलची सत्ता होती. त्यानंतर सर्वसामान्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मी सभापती होतो आणि आता शिवसेनेचे सभापती आहेत. आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे लक्षात घेता पॅनलमध्ये समावेश न झाल्यास पुन्हा स्वतंत्र पॅनल रिंगणात उभे करणार असल्याची माहिती जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी ‘दै. देशदूत’शी बोलतांना दिली.

बाजार समित्यांसाठीही ‘मविआ’ पॅटर्नची चर्चा

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदांच्या आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काही ठिकाणी ‘मविआ’ पॅटर्न राबविण्यात आला. जळगाव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. आता मात्र सत्ता समीकरणे बदलल्याने या आठही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही ‘मविआ’ पॅटर्नची शक्यता वर्तविली जात आहे.

Related Stories

No stories found.