जळगाव : डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर
जळगाव । प्रतिनिधी
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड यांच्या तर्फे पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्मामाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने सोमवारी दि.6 जुलै 2020 रोजी सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 98 श्रीसदस्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होत तत्परतेने आणि शिस्तीने केलेले रक्तदान प्रेरणादायी असल्याचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामनंद यांनी शिबीराला दिलेल्या भेटीप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
नियमांचे पालन करा अन् मनातील भीती काढा
जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुढील काही काळ न घाबरता सतर्क रहा, नियमांचे पालन करा आणि मनातील भीती दूर करा असे आवाहन अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी रक्तदान शिबीर भेटी प्रसंगी केले. तसेच उद्या दि.7 ते 13 जुलै दरम्यान जळगाव, भुसावळ व अमळनेर पालिका क्षेत्रात लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. त्यास नागरीकांनी प्रतिसाद देवून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.उमेश कोल्हे, लक्ष्मण त्रिपाठी, भरत महाले, सचीन बकाल, अनिल पाटील, निलेश पवार, प्रभाकर पाटील यांनी काम पाहीले. यशस्वीतेसाठी श्रीसदस्यांनी परिश्रम घेतले.