जळगावात होतोय घरगुती गॅसचा काळा बाजार

पोलीस उप-अधीक्षकांच्या पथकाची पाच ठिकाणी कारवाई; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगावात होतोय घरगुती गॅसचा काळा बाजार

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरात घरगुती गॅसचा (domestic gas) वापर अवैध रित्या (Illegally) वापर करुन त्या गॅसचा काळा बाजार (Black market) करणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकांनी पाच ठिकाणी कारवाई (Action) केली. या कारवाईत वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या साहित्यांसह गॅस सिलेंडर असा एकूण 11 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात 3 व जिल्हा पेठ व शहर पोलिसात प्रत्येकी एक असा एकूण पाच ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळा बाजार करुन तो प्रवासी वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उप अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाी कर्मचार्‍यांनी पाच पथके तयार करीत शहरातील शनिपेठ, जिल्हापेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत पाच ठिकाणी ही कारवाई केली. यामध्ये घरगुती वापरात असलेल्या गॅस सिलेंडरसह वाहनांत गॅस भरणारे साहित्य असे एकूण 11 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रिक्षात गॅस भरतांना मारला छापा

शाहू नगरातील मकसूदअली न्याजअली सैय्यद वय-66 रा. भिस्तीवाडा हा पडकीशाळेच्या भिंतीलगत रिक्षात गॅस भरत असतांना त्याच्यावर पथकाने छापा टाकला. या कारवाईत त्याच्याकडून 43 हजार 300 रुपयांचे गॅस सिलेंडर व साहित्य जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध गॅसचा वापर करतांना केली अटक

शाहू नगरातील ट्राफिक गार्डनजवळ जाकीर शेख चाँद पिंजारी वय-45 रा. काट्या फाईल व रिक्षाचालक राजेश अर्जुन गोपाळ वय- 38 रा. समता नगर हे रिक्षात अवैध रित्या गॅस भरत असतांना त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

संजय पवार, विकास वाघ, साहेबराव चौधरी, किरण चौधरी, अनिल इंगळे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, राहूल बैसाणे, पंकज शिंदे, कमलाकर बागुल, सुनिल दामोदरे, अनिल देशमुख, किशोर राठोड, युनूस शेख इब्राहिम, लक्ष्मण पाटील, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, हरिश परदेशी, किशोर मोरे, महेश महाजन, प्रितमकुमार पाटील, श्रीकृष्ण देशमुख, योगेश वराडे यांच्या पथकाने केली.

शनिपेठ हद्दीत तीन ठिकाणी छापे

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये काट्याफाईल परिसरातून शेख नदीम शेख रसूल वय-40 याला अटक केली असून त्याच्याकडून 83 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल, तर दुसरी कारवाई जैनाबादमधील महर्षी वाल्मिक मंदिराजवळ करण्यात आली. याठिकाणाहून 2 लाख 10 हजार 40 रुपयांचे गॅस सिलेंडर व साहित्य जप्त करण्यात आले याप्रकरणी गॅस भरणारा मालक कैलास विलास सोनवणे वय-45 रा. वाल्मिक नगर, रिक्षा चालक सुरज नारायण सोनवणे वय-30 रा. गेंदालाल मिल यांना अटक केली आहे. तर तिसरी कारवाई ही जैनाबाद परिसरातील लेंंडी नाल्याजवळील शुभम राजू बोरसे वय-25 रा. वाल्मिक नगर यांच्यासह संदिप अरुण चौधरी वय- 29 रा. पिंप्राळा गणपती नगर, किरण शालीक कोळी वय- 25 रा. समता नगर धामनगाव वाडा, आरिफ अब्दुल रहेमान वय-46 रा. फातेमा नगर, मोहंम्मद सलमान गुलाम शाहीद बागवान वय- 31 रा. जोशीपेठ या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 6 लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात तीन रिक्षांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com