चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी

भाजपातर्फे १६ पैकी १४ ग्रामपंचायतींवर विजयाचा दाव
चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat Elections) झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाने मुसंडी मारत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला (BJP's victory) ठरला आहे. तर महाविकास आघाडीतर्फे आठ ग्रा.पं.वर विजयाचा दाव केला आहे. दाव्या-प्रतिदाव्याचा लाढाईत भाजपाच्या विजयाचे वर्चस्व दिसून येत आहे. विजय उमेदवारांसह कार्यकर्ते आ.मंगेश चव्हाण व खा.उन्मेष पाटील यांच्या संपर्क कार्यालय परिसरात गुलाल, ढोल ताशे व फटाक्यांची आतिशबाजी करत जल्लोष करीत होते. दरम्यान तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मेहुणबारे, दरेगाव, करजगाव व पिपळवाड म्हाळसा या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला झेंडा फडकविला आहे.

चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी
रावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का !
चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी
पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती...

तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणूकीतील सरपंचपदासह सदस्य निवडीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज संकाळी तहसिल कार्यालयात प्रांतधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसिलदार अमोल मोरे यांच्या अधिपत्याखाली जाहीर करण्यात आला. निकाल ऐकण्याची उत्सुकता असलेल्या गावकर्‍यांनी येथील तहसिल कार्यालया बाहेर प्रचंड गर्दी केली होती. १६ पैकी एकूण १४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकाला नंतर राजकीय पक्षांनी तालुक्यात सर्वाधिक सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य आपल्याच पक्षाचे निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यात भाजपाने चौदा पैकी बारा तर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीनेे आठ जागा आपल्या पक्षाला मिळाले असल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूका तालुक्यातील सर्वाधिक जास्त मतदार असलेल्या मेहूणबारे व उबंरखेड ग्रामपंचायतीसाठी निवडणुका यावेळी लक्षवेधी ठरल्या .

मेहूणबारे ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत साळुंखे राजेंद्र कृष्णराव हयांनी सर्वाधिक १७३६ मते मिळवून विजय संपादन केला तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी महाजन तुळशीराम देविदास यांना १३९३ मते मिळाली. उंबरखेड येथील सरपंच पदाच्या निवडणूकीत उज्वला संजय पाटील यांनी २२६९ मते घेत विजय मिळाला त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी सुनिता राजेंद्र पाटील यांना १३०७ मते मिळाली. पिंपळवाड म्हाळसा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत राजश्री भाऊसाहेब पाटील यांना १२०५ मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सरलाबाई नाना महाजन यांना १०४५ मते मिळाली. सांगवी ग्रामपंचायत सरंपच पदाच्या निवडणूकीत कविताबाई संतोष राठोड यांना १४९४ मते विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी लताबाई रमेश राठोड यांना ८०३ मते मिळाली. उपखेड ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूकीत उज्वला दिनकर मगर हया ९९३ मते घेत विजयी झाल्या. त्याच्या प्रतिस्पर्धी प्रतिभा संभाजी मगर यांना ७५६ मते मिळाली.

चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी
धरणगाव तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल घोषित
चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी
VISUAL STORY :सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा

हिंगोणेसीम ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदासाठी गायकवाड भाऊसाहेब दादाभाऊ हे ५७६ मते घेत विजयी झाले, त्यांचें प्रतिस्पर्धी भिला गोरख नाना यांना ३८८ मते मिळाली.करजंगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत अश्विनी किशोर पाटील यांना ५६६ मते घेत विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी दराडे अनिल शातांराम यांना ३८१ मते मिळाली.विसापूर सरंपच पदाच्या निवडणूकीत राठोड निर्मला विजय हयांना ४४१ मते घेत विजयी झाल्या, तर प्रतिस्पर्धी राठोड माधुरी दत्तकुमार यांना ३५१ मते मिळाली.दरेगाव सरंपच पदाच्या निवडणूकीत पाटील गिरीश सर्जेराव हयांना ७१९ मते घेत विजयी झाले तर प्रतिस्पर्धी धनगर राजेंद्र पंढरीनाथ हयांना ४६१ मते मिळाली.

शिदवाडी सरंपच पदाच्या निवडणूकीत पाटील शैलेद्र विजयसिंग हे ७२३ मते घेत प्रचंड मतांनी विजयी झाले, तर प्रतिस्पर्धी पाटील राहुल दिलीप हयांना २५८ मते मिळाली. चिचखेड सरंपच पदाच्या निवडणूकीत पाटील गोपालराव बाबूराव हे ६५९ मते घेऊन विजयी झाले प्रतिस्पर्धी पाटील दिपक चिंतामण हयांना ५९८ मते मिळाली

आडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत रहिले शुभांगी अबंर हया ६९२ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी भारती प्रकाश निकम हयांना ५९३ मते मिळाली. वलढाण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत सरलाबाई सिताराम राठोड यांना ७४२ मते घेऊन विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कविता संजीव राठोड यांना ६५४ मते मिळाली. गणेशपूर येथे सरंपच पदाच्या निवडणूकीत चंद्रकांत साहेबराव पाटील यांना ९६१ मते घेत विजयी झाले. तर प्रमुख प्रतिस्पर्धी पाटील शशिकांत राजेंद्र यांना ८३९ मते मिळाली.

चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडी
VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com