जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची स्वबळाची तयारी

सर्वपक्षीय पॅनलबाबत संभ्रम; कामाला लागण्यासाठी आमदार महाजन यांची सूचना
जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची स्वबळाची तयारी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (District Bank Election) जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येवून सर्वपक्षीय पॅनलबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून (Nationalist) भाजपसोबत (BJP) जाण्याबाबत संभ्रम असल्याने भाजपनेदेखील स्वबळाची तयारी सुुरु केली आहे. दरम्यान, गुरुवारी भाजप कार्यालयात जिल्हा बँक निवडणुकीसदंर्भात झालेल्या बैठकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी 21 जागांवर आपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची सूचना दिल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्हा बँकेबाबत झालेल्या भाजपच्या बैठकीत माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अशोक कांडेलकर, पी.सी.पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने बुधवारी पत्रकार परिषद घेवून जिल्हा बँक निवडणुकीत भाजपसोबत जाण्यास नकार दिला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही भाजपला विरोध असल्याचे समजते. तसेच महाविकास आघाडीचे पॅनल तयार करण्याबाबत चाचपणी सुरु असल्याने अद्यापपर्यंत सर्वपक्षीय पॅनलचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजपने स्वबळाची तयारी करण्याची निर्णय घेतला असून 21 जागांवर संभाव्य उमदेवार देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व काय?

जिल्हा बँक निवडणुकीत भाजप सोबत जाणार नाही असा इशारा काँग्रेसने दिला आहे. याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, ते म्हणाले की, काँग्रेसला भाजप सोबत यायचे नव्हे तर, सर्वपक्षीय पॅनलबाबत आतापर्यंत तीन बैठका का घेतल्या? असा सवाल आमदार महाजन यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे अस्तित्व जिल्ह्यात काय आहे. हे सर्वांनाच माहित आहे. सद्यातरी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याबाबत विचाराधीन आहे. जागा वाटपाबाबतचे सुत्रदेखील निश्चित झाले आहे. मात्र, युती नाही झाली, तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचेही भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

मनपात भाजपला स्पष्ट बहुमत

भाजपतील 57 नगरसेवकांपैकी 30 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यातील 13 नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. सत्तेसाठी सद्यातरी विचार नाही. मात्र, दिवाळी-दसरा होवून जावू द्या. त्यानंतर बघू, असेही माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com