शेतकर्‍यांसाठी भाजपाचा जळगावात आक्रोश मोर्चा

शेतकरी के सन्मान मे भाजपा मैदान मे यासह विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला
शेतकर्‍यांसाठी भाजपाचा जळगावात आक्रोश मोर्चा

जळगाव - jalgaon

शेतकरी के सन्मान में भाजपा मैदान में,शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करा, यासह विविध घोषणाबाजी करीत भाजपने सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास शिवशितिर्थ मैदानापासून शेतकर्‍यांसाठी आक्रोश मोर्चा काढला.

या मोर्चाचे नेतृत्व भाजपा नेते (MLA Girish Mahajan) आमदार गिरीश महाजन, (MP Unmesh Patil) खासदार उन्मेश पाटील, (MP Raksha Khadse) खा.रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे आदींनी केले. हा ट्रॅक्टर मोर्चा शिवतीर्थ मैदान मार्गे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकला. भाजपा कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालया परिसर दणाणून सोडला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com