भाजपच्या गटनेते पदावर होणार शिक्कामोर्तब

गटनेते पदावर दावे-प्रतिदावे
भाजपच्या गटनेते पदावर होणार शिक्कामोर्तब

जळगाव - jalgaon

महानगरपालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे नेते गटनेते (BJP's group leader)कोण यावर पेच कायम आहे. एकीकडे भाजपचे बंडखोर नगरसेवक ऍड. दिलीप पोकळे (Corporator Adv. Dilip Pokale) यांनी तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक तथा भगत बालाणी (Bhagat Balani) यांनी दावा केला आहे. त्यामुळे उद्या दि. १३ रोजी होणार्‍या महासभेत (General Assembly) भाजपच्या गटनेतेपदावर (group leader) शिक्कमोर्तब (Shikkamortab) होणार आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे ५७ नगरसेवक निवडून आलेत. जळगावकरांनी भाजपला कौल दिला असून महानगरपालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली. मात्र अडीच वर्षानंतर भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करुन भाजपच्या सत्तेला सुरूंग लावला. त्यामुळे बंडखोरांच्या पाठींब्यावर भाजपला सत्तेवरुन पायउतार व्हावे लागल्याने शिवसेनेने महानगरपालिकेवर भगवा ङ्गडकवला.

दरम्यान, बंडखोर नगरसेवकांनी बैठकीत गटनेतेपदी ऍड. दिलीप पोकळे तर उपगटनेते पदी चेतन सनकत यांची एकमताने निवड करण्याचा ठराव केला, आणि तेव्हा पासून गटनेता कोण यावर खल सुरु झाला. एकीकडे भाजपचे गटनेते म्हणून ऍड. दिलीप पोकळे तर दुसरीकडे अधिकृत गटनेते म्हणून भगत बालाणी दावे प्रतिदावे करु लागले आहे.

दोन महिन्यांपूर्वी प्रभाग समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीतही गटनेते पदाचा वापर करीत ऍड. दिलीप पोकळे यांनी भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावला होता. त्यामुळे भाजपच्या गटनेतेपदावर पेच कायम असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या होणार्‍या महासभेत भाजपचे अधिकृत गटनेते कोण यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महिला बालकल्याण समितीचे पुनर्गठण

महापालिकेने गठीत केलेल्या महिला व बालकल्याण समितीची मुदत १ ऑक्टोंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे समितीचे पुनर्गठण करुन समितीतील ९ सदस्यांची निवड पक्षीय बलाबलनुसार गटनेत्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

मालमत्ता कराची अगाऊ रक्कम भरणार्‍यांना सूट देण्याचा होणार निर्णय

महानगरपालिकेची महासभा उद्या दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन होणार आहे. या सभेत मालमत्ता कराची रक्कम आगाऊ भरल्यास किती टक्के सूट मिळणार या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार आहे.

स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची होणार निवड

महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर पक्षीय बलाबलनुसार नूतन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. भाजपचे गटनेते कोण हे सिद्ध झाल्यानंतर सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.