महापालिकेत फवारणी करुन भाजपची गांधीगीरी
आंदोलनादरम्यान मशीनचे केले पूजन

महापालिकेत फवारणी करुन भाजपची गांधीगीरी

फवारणी मशीन असतांनाही वापर न करता पडल्या अडगळीत

जळगाव - Jalgaon

शहरात डेंग्यू, मलेरिया तसेच चिकूनगुनिया (Dengue, malaria, chikungunya) यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, महापालिकेतील (Municipal Corporation) सत्ताधारी व प्रशासन मात्र, हातावर हात धरून बसले आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या (BJP) भाजपकडून गुरुवारी चक्क जळगाव शहरातील महापालिकेच्या इमारतीत धुरळणी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

शहरात साथीचे आजार वाढले आहेत. तर दुसरीकडे महापालिकेत १५ ते १६ फॉंगिंग मशीन असतांनाही कुठलीही फवारण केली जात नाहीये. तसेच महापालिकेकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाहीये. या विरोधात गुरुवारी भाजपतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी फॉगिंग मशीनही आणण्यात येवून फवारण करण्यात आली. मशीनचे पूजन करण्यात आले. याव्दारे महापालिकेतील फॉंगिंग मशीन (Fonging machine) पूजेसाठी नाहीये, त्याचा वापरही करा, असा उपरोधीक संदेश भाजपतर्फे या आंदोलनातून देण्यात आला.

यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने महापालिकेची सतरा मजली इमारत दणाणली होती. यावेळी महापालिकेच्या इमारतीतही फवारणी करण्यात आली. जळगाव शहरात साथीचे आजार वाढू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात भाजप महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक जितेंद्र मराठे, नगरसेवक राजू मराठे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका ऍड शुचीता हाडा, नगरसेविका दिपमाला काळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक साखरे, भाजप महानगराध्यक्षा दिप्ती चिरमाडे, डॉ. राधेशाम चौधरी, किशोर चौधरी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com