जि.प.साठी भाजपाचा ‘40 प्लस’चा निर्धार

निवडणुकांसाठी सज्ज राहावे, कार्यकर्त्यांना नेत्यांचे आवाहन
जि.प.साठी भाजपाचा ‘40 प्लस’चा निर्धार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदा, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) निवडणुकांसाठी (Elections) भाजपाच्या (BJP)प्रत्येक कार्यकर्त्याने आत्तापासून कामाला लागावे. गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची (BJP) सत्ता आहे. यावेळेला परिस्थीती मात्र वेगळी आहे. सेना,काँग्रेस, राष्ट्रवादी एकीकडे तर दुसरीकडे भाजपा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर 40 प्लस (40 plus) जागा जिंकून जळगाव जिल्हा हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचे सिध्द करण्याचा निर्धार शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा बैठकीत करण्यात आला.

भाजपाची (BJP) जिल्हा बैठक जीएम फाऊंडेशनच्या कार्यालयात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष (District President) आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीला भाजपाचे नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, खा.उन्मेश पाटील, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, माजी आ. स्मिता वाघ, अ‍ॅड. किशोर काळकर, जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार महाजन, पी.सी. पाटील, अजय भोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा 40 जागा जिंकणारच

जिल्हा बैठकीत भाजपाचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) म्हणाले की, राज्यात नुकत्याच नगरपालिकांचे निकाल लागले. या निकालात भाजपाचे सर्वाधिक सदस्य निवडून आले. आता जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये (Elections) भाजपा स्वबळावरच लढली आहे. आता मात्र परिस्थीती वेगळी असून भाजपाविरोधात सर्व पक्ष एक झाले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे 10 गट देखिल नव्याने वाढले आहेत. संख्याबळ 77 होणार असल्याने बहुमतासाठी (majority) 40 हा मॅजिक फिगर राहणार आहे. त्यामुळे मिनी विधानसभा (Mini assembly) असलेल्या या निवडणुकीसाठी दिवसरात्र एक करून जिल्हा परिषदेत 40 प्लस जागा जिंकूून हा जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिध्द करून दाखवू असा निर्धार आ. महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांनीही कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी आत्तापासून कामाला लागावे असे आवाहन केले. सुत्रसंचालन जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांनी केले तर आभार अजय भोळे यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com