भाजप युवा मोर्चातर्फे रावेरात मोटार सायकल रॅली

मोदी सरकारच्या ८ वर्षाच्या कार्यकाळाचे अभिनंदन
भाजप युवा मोर्चातर्फे रावेरात मोटार सायकल रॅली
मोटार सायकल रॅलीसाठी उपस्थित भाजप पदाधिकारी

रावेर - प्रतिनिधी raver

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची आठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त (jalgaon) जळगाव जिल्हा युवा मोर्चाच्या माध्यमातून शुक्रवारी रावेर येथे विकास तीर्थ अभियानाच्या निमित्त बाईक रॅली (Bike rally) काढण्यात आली.

पुढील ७ दिवस जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही रॅली फिरणार आहे. जळगांव युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात ह्या रॅलीची सुरवात करण्यात आली. रावेर भाजप (bjp) कार्यालयापासून पुढे रावेर शहरात,विवरा,वाघोदा व सावदा शहर अश्या विविध ठिकाणी ही रॅली संपन्न झाली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, शहर अध्यक्ष दिलीप पाटील,माजी भाजपा अध्यक्ष सुनील पाटील, भाजपा सरचिटणीस सी एस.पाटील, उपाध्यक्ष वासू नरवाडे,गोपाल नेमाडे,प.स.सदस्य जूम्मा तडवी, हरलाल कोळी,संदीप सावळे, चिनावल सरपंच योगेश बोरोले, महेश पाटील,युवा मोर्चा सरचिटणीस शुभम पाटील,नत्थु धांडे, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष मनोज श्रावक,युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन महाजन, अजिंक्य वाणी,राहुल महाजन,सागर भारंबे, सागर चौधरी अतुल महाजन,मनोज सोनार,नितीन पाटील,गिरीश पाटील, निलेश सावळे,उमेश कोळी यांच्यासह तीय जनता युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com