जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपच्या सर्व उमेदवारांची माघार

जिल्हा बँक निवडणुकीतून भाजपच्या सर्व उमेदवारांची माघार

आ.गिरीश महाजनांसह सर्वच उमेदवारांचा निवडणुकीवर बहिष्कार

जळगाव - jalgaon

जिल्हा बँकच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी माघारीसाठी शेवटचा दिवस होता. दरम्यान निवडणुक रिंगणात असलेल्या (bjp) भाजपच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली आहे. सत्तेचा दुरूपयोग व अनियिमित कर्ज वाटप या कारणांमुळे भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकत सर्वच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतली असल्याची माहिती भाजप नेते (Girish Mahajan) गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागापैकी ६ जागांवर बिनविरोध निवड झाली होती. उर्वरीत १७ जागांपैकी दोन जागांचे अर्ज बाद झाले होेते. त्यामुळे १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. दरम्यान माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यासह सर्व उमेदवारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेतली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर महाविकासआघाडीची सत्ता कायम राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com