भाजप दूध संघ निवडणूक लढविणार

भाजप दूध संघ निवडणूक लढविणार

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जळगाव जिल्हा दूध संघाची (Jalgaon District Milk Association) निवडणुक (election) भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) पूर्ण ताकदीनिशी लढविणार (fight) असल्याची माहिती भाजपाचे (District president of BJP) जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे (MLA. Rajumama Bhole) यांनी दिली.

आ.राजूमामा भोळे
आ.राजूमामा भोळे

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणुक जाहीर झाली असून, राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने सपशेल माघार घेतली होती. त्यामुळे दूध संघाची निवडणुक भाजप लढविणार का? असा प्रश्न होता.

मात्र, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आज पार पडली. या बैठकीला खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत दूध संघाच्या 20 जागा लढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शिंदे समर्थक आमदारांशीदेखील चर्चा करुन संयुक्त पॅनल देण्याबाबत मंत्री गिरीश महाजन हे निर्णय घेतील. अशी माहिती आ.भोळे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com