घनकचरा प्रकल्पाच्या प्रश्‍नावरुन भाजप आक्रमक

मक्तेदारांच्या नार्कोटेस्टची सुनील महाजन, ललित कोल्हेंकडून मागणी
घनकचरा प्रकल्पाच्या प्रश्‍नावरुन भाजप आक्रमक

जळगाव jalgaon

महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) मागील महासभेत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या (Solid waste processing project) सुधारीत प्रस्तावावर भाजपतर्ङ्गे ऍड.शुचिता हाडा (Adv. Shuchita Hada) यांनी विरोध दर्शविला होता. मात्र, ठरावावर केवळ हाडा यांचाच विरोध नोंदविला गेल्याने इतिवृत्त (Chronicle) मंजूर करतांना भाजपने (bjp) आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या सर्व नगरसेवकांचा (corporator) विरोध असल्याचा नोंद करावी अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, याच मुद्यावरुन महासभेत भाजप आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मनपाची विशेष महासभा (General Assembly) महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते.

महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा आटोपल्यानंतर नियमित विशेष महासभेला सुरुवात झाली. महासभेच्या विषय पटलावरील इतिवृत्त (Chronicle) मंजूर करण्याच्या प्रस्तावावर भाजपच्या नगरसेविका ऍड.शुचिता हाडा (Adv. Shuchita Hada) यांनी हरकत घेतली. घनकचरा प्रकल्पाच्या सुधारीत प्रस्तावाला भाजपच्या सर्व नगरसेवकांचा विरोध (Protest) असतांना ठरावावर नोंद का केली गेली नाही? असा सवाल उपस्थित करुन ठराव बेकायदेशिर असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावर नितीन लढ्ढा (Nitin Ladha) यांनी एकट्या शुचिता हाडा म्हणजे भाजप नव्हे असा टोला लगावत चुकीच्या गोष्टींसाठी हट्ट धरणे योग्य नसल्याचे सभागृहात सांगितले. त्यावर विशाल त्रिपाठी, दिपमाला काळे, भारती सोनवणे, कैलास सोनवणे, उज्वला बेंडाळे यांनी त्या प्रस्तावाला सर्वांचाच विरोध असून, ऍड. शुचिता हाडा यांनी भाजपची भूमिका मांडली होती. असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.


प्रशासनाकडून दिशाभूल
घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या (solid waste project) सुधारीत प्रस्तावावरुन ऍड.शुचिता हाडा यांनी प्रशासनासह सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. शेवटपर्यंत त्यांनी घनकचरा प्रकल्पाच्या प्रस्तावाला भाजपच्या सर्व नगरसेवकांचा विरोध असल्याची नोंद करुन घ्यावी, अशी मागणी केली. प्रशासनाकडून (administration) दिशाभूल (Misleading) होत असून अनियमितता असल्याचा आरोप देखील केला. दरम्यान, ठरावाच्या बाजुने मतदान करणार्‍यांनी सावध रहावे, असा टोलाही ऍड. हाडा यांनी लगावला.


भाजपची अवास्तव मागणी
ऍड.शुचिता हाडा यांनी इतिवृत्ताला विरोध असून मतदान घ्या. अशी मागणी केली. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक (corporator) नितीन लढ्ढा (Nitin Ladha) यांनी ठराव पारित झाला आहे. आता दुरुस्ती करणे शक्य नाही. इतिवृत्तावर मतदान होत नाही. त्यामुळे भाजपची अवास्तव आणि चुकीच्या पध्दतीची मागणी होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.


अनियमितता नाही
ऍड.शुचिता हाडा यांनी प्रशासनावर आरोप केल्यानंतर मनपा आयुक्त (Commissioner) यांनी त्यावर खुलासा केला. ते म्हणाले की, घनकचरा प्रकल्पाचा वाढीव निधी वित्त आयोगातून तरतूद केली आहे. मागच्या महासभेतच वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे. यात अनियमिततेचा (irregularity) प्रश्‍नच नाही. असे आयुक्तांनी सांगितले.


...तर सत्य समोर येईल
घनकचरा प्रकल्पाचा मक्तेदार (Monopolistic) कोण? असा प्रश्‍न कैलास सोनवणे यांच्यासह भाजपच्या काही नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर संतप्त होत मनपा विरोधीपक्ष नेते मक्तेदाराची नार्कोटेस्ट (Narcotest) करण्याची मागणी केली. ते कोणाला भेटला, कोणाच्या संपर्कात होता, याची माहिती समोर येवू द्या. असे, म्हणत असतांनाच सभागृहनेते ललित कोल्हे यांनीही भूमिगत गटारींचे काम देणार्‍या ठेकेदाराचीही नार्कोटेस्ट करा म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होईल. असे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.


बेकायदेशिर ङ्गलकांमुळे विद्रुपीकरण
महापालिका हद्दीत किंवा महापालिकेच्या जागेवर लावण्यात येणारे ङ्गलक, बॅनर, आकाश चिन्हे याबाबत धोरण ठरविण्याच्या प्रस्तावावर नगरसेवक बंटी जोशी यांनी भूमिका मांडत, प्रशासनाला धारेवर धरले. बेकायदेशिर बॅनर्समुळे (Illegal banners) शहराचे विद्रुपीकरण (Disfigurement)होत आहे. मात्र, प्रशासन कुठल्याहीप्रकारची कारवाई करीत नाही. शहरातील महापुरुषांचे पुतळे बॅनर्समुळे झाकोळले जातात, तरीदेखील प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप जोशी यांनी केला.


सागरपार्क, बालगंधर्व दर निश्‍चितीचा ठराव रद्द
मनपा मालकीचे सागरपार्क, बालगंधर्व यासह उद्याने व मनपाच्या जागा कार्यक्रमांसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी दरनिश्‍चितीचा ठराव (Resolution of the rate) मनपा प्रशासनाच्या पटलावर ठेवण्यात आला होता. या ठरावावर बंटी जोशी, नितीन बरडे, विष्णू भंगाळे, कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, ऍड.शुचिता हाडा, यांनी भाडेतत्वावर देतांना काही निकष ठरवून द्यावे. त्यासंदर्भात अटी-शर्ती बंधनकारक कराव्यात, कार्यक्रमाचे स्वरुप लक्षात घेवून दर (rate) निश्‍चिती करावी. अशा प्रकारच्या भूमिका सदस्यांनी मांडल्या. त्यावर महापौर जयश्री महाजन यांनी सर्व सूचना लक्षात घेवून दर निश्‍चितीचा ठराव रद्द केला. त्याचबरोबर सामाजिक संस्थांना ओपनस्पेस देण्याबाबतचे ठरावदेखील सर्वानुमते रद्द करण्यात आले आहे.


भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
महापालिकेच्या सभागृहातील आसन व्यवस्था बदलल्याने भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, सभागृहात ठिय्या आंदोलन (Theya movement) केले. दरम्यान, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी भाजपच्या नगरसेवकांना विनंती केल्यामुळे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.


स्व. डॉ.अविनाश आचार्य (Late. Dr. Avinash Acharya) यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरव करण्याचा ठराव जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात सेवाभावी व्यक्तीमत्व, जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष, वैद्यकिय क्षेत्रातील अतुलनीय कार्य अशा सर्वच क्षेत्रात योगदान असलेले बहुआयामी व्यक्तीमत्व स्व. डॉ.अविनाश आचार्य यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार (Padma Award) देवून यथोचित गौरव करण्याबाबतचा ठराव ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सभागृहाच्या पटलावर मांडला. दरम्यान, सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com