भाजपचेच दहशतवाद्यांशी संबंध

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा आरोप
एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत, भाजपने मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपचेच (BJP) दहशतवाद्यांची (terrorists) संबंध (relationship) असल्याचा आरोप (Allegations) राष्ट्रवादीचे नेते (NCP leader) माजी मंत्री एकनाथराव खडसे (former minister Eknathrao Khadse) यांनी आज माध्यमांशी बोलतांना केले. दरम्यान, दहशतवादी असलेल्या इकबाल मिर्ची कडून भाजपने पार्टी देणगी मिळाली असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

भाजपची या संदर्भात दुहेरी भूमिका आहे. दाऊदशी व्यवहार झाला किंवा आणि दाऊदच्या बहिणीशी (David's sister) व्यवहार केला. असा ठपका ठेवत ईडीने (ED) मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यांच्यावर ठेवलेले आक्षेप अद्याप सिध्द झालेले नाहीत.

परंतू, एका बाजुने दाऊदशी संबंध जोडत असतांना भाजपलाही (BJP) इकबाल मिर्चीकडून (Iqbal Mirchi) पार्टी देणगी मिळालेली आहे. इकबाल मिर्ची हा कोण आहे? हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचेही खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. माजी मंत्री आ. गिरीश महाजनांनी (Former Minister Girish Mahajan) नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले. म्हणून त्यांचे दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध आहेत. असे म्हणता येईल का? असा सवाल उपस्थित करत, यावर खुलासा केला पाहीजे. असा पलटवारही माजी मंत्री खडसे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com