जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व

जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व

जामनेर Jamner प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील बारा ग्रामपंचायत पैकी नऊ ग्रामपंचायतींवर (Gram Panchayat Elections) भारतीय जनता पार्टीची (BJP) एक हाती सत्ता आली असून दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत तर एका ग्रामपंचायतीवर अपक्ष यांनी यश मिळविले आहे

तहसील कार्यालयामध्ये दोन टप्प्यांमध्ये मतमोजणी झाली त्यामध्ये सकाळी साडेनऊ वाजता पहिल्या टप्प्यातील करमाड खादगाव पळासखेडा बुद्रुक मोहाडी मालदाभाडी राजनी या गावाची मतमोजणी झाली असून दुसऱ्या टप्प्यात चिंचखेडा बुद्रुक हिंगणे बुद्रुक कोदोली ग्रामपंचायत टाकळी खुर्द सोनारी या गावाची मतमोजणी झाली मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी समोर मतमोजणी झाली.

यात सोनारी सरपंच पदासाठी विजयी उमेदवार कल्पना राजेंद्र पाटील यांना 608 पराभूत उमेदवार माझी जि प सदस्य सुनीता विलस पाटील यांना 571 मालदाभाडीविजयी अनिल वासुदेव उबरकर - 601 तुशार गजानन उंबरकर - 357 खादगाव -विजयी डिगंबर देवराद चिंचोले 896 पद्माकर प्रल्हाद चौधरी 536 हिगणे बूविजयी प्रशांत सुरेश पाटील 545 अवघ्या एका मताने पराभूत सुपडू संतोष बाविस्कर 544 करमाड विजयी - सपना प्रविध पाटील 704           प्रियंका चेतन पा. 450 चिंचखेडा-विजयी ज्योती रमेश पारधी 996 ममता शांताराम भिल्ल 964रांजणी-विजयी द्वारकाबाई भाऊवर पाटील 832 कल्पना सोपान कोळी 445 मोहाडी विजयी चंद्रकल रघुनाथ कोळी 1127कमल केशव भिल 845 टाकळीविजयी जितेंद्र प्रल्हाद माळी  832 सारंगधर पांडुरंग अहिरे 622 चिलगाव बिनविरोध मनिषा बापू बागुल पळसखेडा बू विजयी भिका राजाराम तायडे -908 देविदास रघुनाथ पाटील -896कोदलीविजयी किरण विश्वनाथ पाटील 741 नामदेवे उत्तम काळे 264 अशाप्रकारे तालुक्यातील बारा ग्रामपंचायत साठी सरपंच पदाचे विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार आहेत.

यात भारतीय जनता पार्टीच्या बहुतांशी ठिकाणी भाजपाच्या दोन्ही गटांमध्ये निवडणूक झाली यात 12 पैकी नऊ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असून दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत तर एका ग्रामपंचायतीवर अपक्ष यांनी यश मिळविले आहे भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार यांचा राज्याचे ग्रामविकास मंत्री मा ना गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तहसील कार्यालयात मतमोजणी तहसीलदार अरुण शेवाळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत निंबाळकर यांच्या उपस्थित पार पडली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी यावेळी चौक बंदोबस्त ठेवला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com