जिल्हा दूध संघातून आमदार खडसेंचा फोटो भाजपाने हटविला

नवा वाद उभा राहण्याची शक्यता
District Milk Union
District Milk Union

जळगाव - jalgaon

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यालयातून अध्यक्षांच्या दालनातून मार्गदर्शक म्हणून लावलेला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा फोटो भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या सूचनेनुसार आज हटविण्यात आला. हा फोटो हटविण्यात आल्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपा (bjp) आणि शिंदे गट पर्यंत शेतकरी विकास पॅनल सत्ता काबीज केली जिल्हा दूध संघात सत्ता स्थापनेनंतर आज चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे भाजपाचे चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण हे जिल्हा दूध संघाचे नवे चेअरमन म्हणून निवडण्यात आले. जिल्हा दूध संघात 2015 मध्ये एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल निवडून आले होते त्यामुळे त्यांचा फोटो दूध संघ अध्यक्ष यांच्या दालनात मार्गदर्शक म्हणून लावण्यात आला होता आज आमदार मंगेश चव्हाण यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविण्यापूर्वी भाजपचे मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी अध्यक्षांच्या दालनात मार्गदर्शक म्हणून लावण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा फोटो तात्काळ हटविण्याच्या सूचना केल्या.

मंत्री महाजनांच्या सूचनेनुसार दूध संघातील कर्मचाऱ्यांनी खडसेंचा फोटो हटवून बाजूला केला त्यानंतर मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना अध्यक्षांच्या खुर्चीत बसविले.

यावेळी दूध संघाचे संचालक चिमणराव पाटील, संजय पवार, रोहित निकम, अरविंद देशमुख यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. जिल्हा बँकेत मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांचा फोटो हटविण्यावरुन वाद झाला होता. आता जिल्हा दूध संघात आमदार एकनाथराव खडसे यांचा फोटो हटविल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानाप्रमाणे मार्गदशकहि बदलतात-आ.खडसे

देशात ज्याप्रमाणे पंतप्रधान आणि राष्ट्रपती बदलतात त्याचप्रमाणे मार्गदर्शकहि बदलत असतात. आता अध्यक्षांचे दोन मार्गदर्शक आहेत. आता ते कुणाचा फोटो लावतील हा त्यांचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रावादीचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com