खडक्यात ऑईल मिलच्या नावाखाली बायोडिझेल निर्मिती कारखाना

खडक्यात ऑईल मिलच्या नावाखाली बायोडिझेल निर्मिती कारखाना

भुसावळ Bhusaal । प्रतिनिधी

येथून काही अंतरावर असलेल्या खडका (Khadak) औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी एंटरप्राजेस या कंपनीच्या गोदामात बायोडिझल सदृष्य इंधनाचा (Biodiesel manufacturing plant) अत्यंत ज्वलनशील असा सुमारे 80 हजार लिटरचा साठा तालुका पोलिस व महसुल यंत्रणेने (Police and Revenue) जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे बायोडिझल भुसावळ, मुक्ताईनगर व मलकापूर भागात विकले जात असल्याची या भागात चर्चा आहे.

डिवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना खडका औद्योगिक वसाहतीत बनावट बायोडिझल तयार केले जाते अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तालुका पोलिस, महसुल विभाग व इंडियन ऑईलच्या प्रतिनिधींनी अचानक दुपारी 1 च्या सुमारास या इंडस्ट्रीजमध्ये धडक दिली. तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल पवार, हवालदार युनूस शेख यांच्यासह आरसीपीचे एक प्लाटून तेथे पोहोचले. या पथकाने लक्ष्मी एंटरप्राईजेस या कंपनीची तपासणी केली असता या ठिकाणी जवळपास 80 हजार लिटर बायोडिझल सदृष्य इंधनाचा साठा मिळून आला.

यावेळी तेथे हजर कंपनी कर्मचारी काहीही बोलायला तयार नव्हते. कंपनीचे मालक हे गुजरातेत राहतात इतकीच माहिती असल्याचे सांगितले. इंडियन ऑईल कंपनीच्या पथकाने या इंधनाचे वीस नमुने घेतले असून ते तपासणीसाठी मुंबईतील फॉरेन्सीक लॅब येथे पाठविले आहे. महसुल विभागाचे नायब तहसीलदार अंगद आसटकर व पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे यांनी स्वतंत्रपणे नमुने गोळा केले आहे. औद्योगिक वसाहतीतील या कंपनीसमोर दोन टँकर व एक मॅटेडोअर आढळून आला.

जीजे 030 एझेड 2150, जीजे 03 डब्ल्यु 8810 व जीजे 21 टी 5953 असे गुजरात पासिंगचे वाहने आढळून आले. या वाहनांमध्ये हा 80 हजार लिटरचा प्रचंड इंधन साठा आढळून आलेला आहे. भुसावळ शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारचे इंधन विकले जाते, अशी ओरड ही होतीच. मात्र संबंधित विभागाशी लागेबांधे असल्याने याबाबत वाच्यता होत नव्हती.

इतक्या मोठ्या प्रमाणावर गुजरात कनेक्शन असलेला हा साठा भुसावळच्या बगलेत अर्थात खडका एमआयडीसी मध्ये आढळून आल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच पोलिसांनी या संबंधीत दोन जणांना ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com