दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार प्रौढ ठार

नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावरील घटना; रुग्णालयात गर्दी
दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार प्रौढ ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ (Near Railway Flyover) दुचाकी अपघातात (bike accident) मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील दिलीप विश्वनाथ देवरे (Dilip Vishwanath Deore) (वय-57) यांचा दुर्देवी मृत्यू (unfortunate death) झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण येथे दिलीप देवरे हे आई, पत्नी व मुलासोबत वास्तव्याला होते. फर्निचरचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी 2 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ दुचाकीने येत असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

अपघात कसा घडला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकी महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉ .चंदन महाजन यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी जयाबाई, मुलगा गणेश आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com