जुगारासाठी दुचाकी चोरणारा जेरबंद

तोंडापूरच्या तरुणाकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत ; शहर पोलिसांची कामगिरी
जुगारासाठी दुचाकी चोरणारा जेरबंद

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जुगार खेळण्यासाठी (gamble) पैसे नसल्याने तो दुचाकीचोरीकडे (Bike theft) वळला, जळगाव शहरातून एक दोन नव्हे तब्बल 15 दुचाकी चोरल्या. चोरलेली दुचाकी विकली की त्यातून मिळालेले पैसे जुगारामध्ये उडवायचा अन् चोरी करायचा. याप्रमाणे दुचाकी चोरणार्‍या चोरट्यांचा (thieves) जळगाव शहर पोलिसांनी (Jalgaon City Police) पर्दाफाश (Exposed) केला आहे.

पोलिसांनी मंगळवारी संशयित इब्राहीम मुसा तांबोळी (वय-26) रा. तोंडापूर ता.जामनेर जि.जळगाव याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व पोलीस नाईक भास्कर ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणण्याबाबत जळगाव शहर पोलिसांना आदेश दिले होते.

याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी गुन्हे पथकातील कर्मचार्‍यांचे पथक तयार करुन सुचना व मार्गदर्शन केले होते. संशयिताने शहर पोलीस ठाण्यासह जिल्हापेठच्या हद्दीतून दुचाकी चोरल्या आहेत. त्याच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

15 दुचाकी चोरल्याची कबूली

गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर व पोलिस नाईक भास्कर ठाकरे या दोघांना दुचाकी चोरटा नेहमीप्रमाणे चोरी करण्यासाठी गोलाणी मार्केटमध्ये आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजयसिंह ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे यांच्यासह विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी सापळा रचून संशयित इब्राहीम मुसा तांबोळी याला शहरातील गोलाणी मार्केटमधून अटक केली आहे.

त्याने शहरातील विविध ठिकाणांहून 15 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामधील चोरीच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित इब्राहीम यास जुगाराचे व्यसन आहे. जुगार खेळायला पैसे नसल्याने त्यासाठी तो दुचाकीचोरीकडे वळला.

शहरातून दुचाकी चोरली की तोंडापूर येथे जुगाराच्या क्लबवर विकायचा, व मिळालेले पैसे जुगारामध्ये उडवायचा अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com