बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

रावेर पोलीस स्टेशन येथे बस चालकांवर गुन्हा दाखल
बसच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

रावेर|प्रतिनिधी-

पालहून मोरव्हालकडे येणाऱ्या बस-मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहे. याबाबत रावेर पोलीस स्थानकात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी ९.४५ वा.पाल खरगोन रोडवर मोरव्हाल गावाजवळ मोटार सायकल (क्र.एमपी १० एमसी ०१३०) वरील सुनील भिलाला,बबलू भिलाला,विठ्ठल भिलाला हे तिघे मोरव्हालकडे येत असतांना त्याच दिशेने चालत असलेल्या एसटी बसने, मोटार सायकलला दिलेल्या धडकेत सुनील भिलाला व बबलू भिलाला जखमी झाले आहे व मोटारसायकल चालक विठ्ठल भिलाला (वय-५०) यांच्या पायाला गंभीर दुखावत होवून मरण पावला आहे. याबाबत सुनील भिलाला याने दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक सिद्धार्थ मेढे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com