बोरी धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने एकाच दिवसात तीस टक्के वाढ
बोरी धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

योगेश पाटील

पारोळा Parola

तालुक्यासाठी संजीवनी ठरणारे बोरीधरण (Bori Dam) यंदाही शंभरी गाठणार हे काल झालेल्या पाणलोट क्षेत्रात (catchment area) जोरदार पावसामुळे (Due to heavy rain) पस्तीस टक्यावरून धरण ६५ टक्के पाणीसाठा वाढला (Water storage increased) आहे पाणीसाठा अजूनही सुरू आहे बोरी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Vigilance warning to villages) देण्यात आला आहे

पारोळा तालुक्यात दिनांक पाच रोजी रात्री नऊ वाजेपासून ते रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला यात तालुक्यातील करंजी बुद्रुक येथे देखील ढगफुटी सदृश्य प्रकाराचा पाऊस होऊन चाळीस घरांचे नुकसान झाले होते त्याचप्रमाणे बोरीधरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बोरी धरणात रात्री मधूनच भरा भर पाणी वाहत वाहत आले आणि धरणाची पाण्याची टक्केवारी ६५% पोहचली एकूण २६६ मी एवढा पाण्याचा साठा आहे.

दि. चार रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणाची पाण्याची पातळी ही ३५% टक्क्यांपर्यंत पोहोचलेली होती परंतु रात्री पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ही पाण्याची पातळी सकाळी नऊ वाजेपर्यंत ६५ टक्क्यांवर पोहोचली म्हणजे एकाच रात्री मधून तब्बल ३० टक्के च्या जवळपास धरणाच्या पाण्याचा साठा वाढला आहे.

यामुळे सायंकाळी बोरीकाटच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे, पाण्याचा प्रवाह अजूनही सुरूच असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ चालू आहे, त्यामुळे रात्री जर परिसरात पुन्हा पाऊस आला तर कुठल्याही क्षणी धरणाचे गेट उघडण्यात येतील अन्यथा सकाळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याची पातळी बघून गेट उघडण्यात येतेल पाण्याचा प्रवाह असाच राहिला तर उद्यापर्यंत ७० ते ८० टक्के च्या जवळपास धरण भरणे अपेक्षित आहे.

८० टक्के च्या पुढे गेल्यानंतरच धरणाचे गेट उघडण्यात येतील असे येथील शाखा अधिकारी यांनी सांगितले तसेच धरणावरही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे व प्रशासन नदीपात्राच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन सज्ज करण्यात आले आहे

बोरीधरण 65% भरल्याची सुखद वार्ता तालुका वासियांना मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरासह अठरा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा सुटलेला आहे तसेच रब्बी साठी देखील या धरणाचे पाणी तालुक्यावर यांना मिळेल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com