दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीस्वार ठार

कानळदा रस्त्यावरील घटना; दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी
दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दुचाकींची (two-wheelers) समोरासमोर (Face to face) धडक होवून झालेल्या अपघातात (accident) नूतन मराठा महाविद्यालयातील (Nutan Maratha College) शिक्षकेतर कर्मचारी (Non-Teaching Staff) प्रशांत भिकनराव कोळी (Prashant Bhiknrao Koli) (वय-42, रा. उत्तम नगर,कोल्हे हिल्स) यांचा मृत्यू (death) झाल्याची घटना शुक्रवारी कानळदा रस्त्यावरील (Kanalda Road) हॉटेल उत्कर्ष जवळ घडली. तसेच धडकेत दुसरा दुचाकीस्वार गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.

शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील उत्तम पार्क येथे प्रशांत कोळी हे वास्तव्यास असून ते शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आहे. गुरूवारी ते दुचाकीने जळगाव तालुक्यातील मूळ गावी नांद्रा येथे शेतात दुचाकीने गेले होते.

रात्री शेतातून घरी परतत असताना कानळदा रस्त्यावरील उत्कर्ष हॉटेलजवळ समोरुन येणार्‍या दुचाकीचा व त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रशांत कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीवरील चालक हा गंभीर जखमी झाला.

परिसरातील नागरिकांनी केले रुग्णालयात दाखल

परिसरातील नागरिकांनी प्रशांत कोळी व दुस-या जखमी दुचाकीस्वाराला तातडीने नागरिकांनी जिल्हा रूग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती कोळी यांना मृत घोषित केले. तर दुस-या दुचाकीस्वारावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com