पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात युवासेनेकडून सायकल रॅली

हेच का ‘अच्छे दिन’चे पोस्टर हातात घेवून केंद्र सरकारवर साधला निशाणा; केंद्र सरकारचा निषेध
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात युवासेनेकडून सायकल रॅली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीच्या (Fuel price hike) निषेधार्थ (Prohibition) युवा सेनेतर्फे (Youth Sena) रविवारी सायकल रॅलीचे (Bicycle rally) आयोजन करुन इंधन दरवाढीचा निषेध केला. यामध्ये शहरातील युवा सैनिकांनी सहभागी होत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला.

शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील शिवसेना कार्यालयापासून सायकल रॅली काढली. या रॅलीत उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, जि. प. सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्याम कोगटा, नगरसेवक प्रशांत नाईक, अल्पसंख्याक आघाडी महानगर प्रमुख जॅकीर पठाण, उवमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, सरीता माळी, वैष्णवी खैरनार, युवासेना महानगर प्रमुख विशाल वाणी, स्वप्नील परदेशी, अंकित कासार, विराज कावडिया, विकास पाटील, विजय लाड, राकेश चौधरी, अविनाश पाटील, शोएब खाटीक, प्रीतम शिंदे, अतुल घुगे, राकेश चौधरी, पियुष गांधी, जितू बारी निलेश पाटील, निलेश वाघ, केतन पोळ, महेश सानप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही रॅली पुढे नेहरू पुतळा, कोर्ट चौक, जिल्हा क्रीडा संकुल, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्यचौक मार्गे आकाशवाणी चौकात आली. तेथून त्याच मार्गाने परत येऊन टॉवर चौकात रॅलीचा समारोप झाला. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ करणारे मोदी सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com