भुसावळला उद्यापासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला

अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम : प्रबोधनमालेचे चौथे वर्ष
भुसावळला उद्यापासून पुष्पांजली ऑनलाईन प्रबोधनमाला

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

अंतर्नाद प्रतिष्ठानची (Antarnad Pratishthan) फिरती पुष्पांजली प्रबोधनमाला (Revolving Wreath Prabodhanmala) म्हणजे भुसावळची वैचारीक विश्व व्यापक करणारी चळवळ तीन वर्षांपासून या उपक्रमातून रसिकांची सांस्कृतिक भूक भागतेय. यंदा तिचं चौथे वर्ष आहे. कोरोनाचा काळात प्रबोधन मालेचे ऑनलाइन आयोजन 27, 28 व 29 डिसेंबर असे तीन दिवस करण्यात आले आहे. झुम अ‍ॅपच्या (Zoom app) माध्यमातून रसिकांपर्यंत हि प्रबोधनमाला पोहचवण्यात येणार आहे. अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर सुध्दा रसिक या प्रबोधन मालेचा लाइव्ह लाभ घेवू शकणार आहेत.

मनोज गोविंदवार
मनोज गोविंदवार

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील यांच्या मातोश्री स्व. पुष्पा पाटील यांच्या स्मरणार्थ वैचारिक चर्चेचं दालन या अभिनव अशा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उपक्रमासाठी जळगाव येथील कलारसिक विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे अजय बढे यांचे सहकार्य लाभत आहे तर दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि अमोल हरिभाऊ जावळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

नियोजन समितीत प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, अमित चौधरी, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, प्रा.श्याम दुसाने, आर.डी. सोनवणे, शैलेंद्र महाजन, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, राजू वारके, जीवन सपकाळे, हरीष भट, प्रमोद पाटील, भूषण झोपे, सचिन पाटील, प्रा. भाग्यश्री भंगाळे, वंदना भिरूड, यती राऊत, विपश्यना सपकाळे यांचा समावेश आहे. रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, समन्वयक संजय भटकर, सहसमन्वयक देव सरकटे यांनी केले आहे.

या प्रबोधनमालेचे पहिले पुष्प 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मनोज गोविंदवार (जळगाव) हे आयुष्याच बॅलेन्सशीट या विषयावर गुंफणार आहे. द्वितीय पुष्प 28 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता नितीन देशमुख (अमरावती) हे प्रश्न टांगले आभाळाला या विषयावर प्रबोधन करणार आहे तर समारोपीय तृतीय पुष्पात 29 डिसेंबर रोजी सायं. 7 वाजता रवींद्र पाटील (पाचोरा) हे विषय : संस्कार काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.