चाळीसगाव-धुळेे पठोपाठ भुसावळ-देवळाली ट्रेन सुरुची मागणी

चाळीसगाव-धुळे मेमूमध्ये प्रवासाची नियमावली शिथील करा, खासदार उन्मेष पाटील यांनी तातडीने लक्ष घालावे
चाळीसगाव-धुळेे पठोपाठ भुसावळ-देवळाली ट्रेन सुरुची मागणी

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon वार्ताहार-

कोविड-१९ महामारीमुळे बंद असलेली चाळीसगाव-धुळे सेवेला पुन्हा नव्याने सोमवारपासून प्रारंभ झाला. आता चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन पाठोपाठ लांखो चारमान्यांची जीवन वाहनी असलेली भुसावळ-देवळाली रेल्वे सेवा देखील त्वरित सुरु करावी अशी मागणी पुढे येवू लागली आहे. त्यासाठी दिल्लीत आदिवेशानासाठी असलेले खासदार उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी पुढाकार घेवून, रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करुन, भुसवाळ-देवळाली रेल्वे मेमू ट्रेनचा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुसावळ-देवळाली पॅसेजर कोराना महामारीमुळे बंद झाल्यापासून खान्देशातील हजारो चाकरमान्यांचे हाल होत आहे. त्यातच चाळीसगाव हे खान्देशातील मध्यवती ठिकाण असून या गाडीने दररोज हजोरा प्रवासी प्रवास करतात. या गाडीने चाळीसगाव येथून जवळपास चार ते पाच जिल्ह्यांतील प्रवासी ये-जा करतात. सद्या लग्न सराई असल्याने अनेक प्रवशांचे हाल होत आहे. ही गाडी सुरु करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून विविध संघटनानी मागणी केली आहे. परंतू तरी देखील रेल्वे प्रशासन गाडी सुरु करण्याबाबत सकारात्मक भूमीक घेत नसल्यामुळे आता खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेवून भुसावळ-देवळाली पॅसेजर सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. विशेष म्हणजे सद्या दिल्लीत हिवाळी अदिवेश चालू आहे. आणि खासदार उन्मेष पाटील हे दिल्लीतच आहे. त्यामुळे आता त्यांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेवून त्वरित हा प्रश्‍न मार्गी लावावा अशी अपेक्षा खान्देशातील प्रवशांकडून व जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनमध्ये प्रवसाची नियमावली शिथील करा-

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन सेवा नव्याने सोमवार पासून सुुरु झाली आहे. परंतू या मेमू ट्रेनमध्ये कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाचा प्रवासची परवागी देण्यात आली आहे. कोविडच्या कडक नियामवीमुळे या ट्रेनला सद्या प्रवशांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. तर कोविडचे डोस न घेतलेल्यांना तिकिट मिळत नसलयाने, ते विना तिकीट देखील प्रवास करत असल्याची चर्चा आहे.

इतर ट्रेन प्रमाणेच कोविडच्या नियमावलीतच डोस न घेतलेल्यांना किवा कोविडचा एक डोस घेतलेल्याना प्रवासाची परवागी द्यावी अशी मागणी प्रवशांकडून केली जात आहे. खासदारांनी हा देखील मुद्दा रेल्वे खात्याकडे उपस्थित करुन, चाळीसगाव-धुळे मेमूमध्ये प्रवसाबाबतची नियमावलीत थोड्याफार प्रमाणात बदल करुन, सर्वसमान्य चारमान्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com