भुसावळ शहरात वाळुसाठ्यांवर 16 ठिकाणी धडक कारवाई

12 लाख रूपयांचा वाळूसाठा जप्त ः जळगाव, भुसावळ महसुल पथकाची धाड
भुसावळ शहरात वाळुसाठ्यांवर 16 ठिकाणी धडक कारवाई

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वाळुचे लिलाव अद्यापही झालेले नसतांना (sand has not been auctioned) भुसावळ शहर व परिसरात वाळू उपयोगी पडणारे बांधकामे सुरू आहेत. वाळूचा लिलावच होत नाही तर बांधकामाला (construction) वाळू आणली कोठून? असा प्रश्न उपस्थित करून जळगाव येथील आरटीआय कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता (RTI activist Deepak Kumar Gupta) यांच्या तक्रारीवरून दि.23 रोजी दिवसभर जळगाव व भुसावळच्या महसुल पथकाने (Revenue team from Jalgaon and Bhusawal) संयुक्तरित्या कारवाई (Action) करून 12 लाख रूपयांची 502 ब्रास वाळू जप्त (वाळू जप्त) केल्याने बांधकाम व्यवसायीकांमध्ये (Builders) मोठी खळबळ उडाली आहे. सदर कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, गेल्या आठवड्यात जळगाव येथे अशा प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली. त्याच पार्श्वभुमीवर जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून आज (दि.23) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा गौण खनिज अधिकारी दिपक चव्हाण, भुसावळचे निवासी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांच्यासह सहा तलाठी, दोन सर्कल व अन्य अशा दहा ते पंधरा महसुली कर्मचार्‍यांनी शहर पिंजून काढले. माहिती कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या माहितीवरून शहरातील टिव्ही टावर परिसर, हनुमान नगर व परिसर, वांजोळा रोड, मिरची ग्राऊंड, माळी भवन परिसर व अन्य ठिकाणी बांधकाम व अन्य उपयोगासाठी असलेला रेती साठा जप्त करून पंचनामा केला

. एकूच सोळा ठिकाणी हा वाळू साठा आढळून आला. सुमारे 502 ब्रास वाळू किंमत 12 लाख रूपये असे पंचनामा केला गेला. सदरच्या कारवाईमुळे बांधकाम व्यवसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सदरची कारवाई यापूढे देखील चालु राहणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात वाळू लिलावच जर झालेले नाही तर भुसावळात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळू आलीच कशी? असा प्रश्न असुन ही वाळू वाघूर, गिरणा व अन्य नद्यांमधून रात्रीच्या वेळी चोरी करून शहरासह अन्य ठिकाणी पोहचविली गेली असावी असा कयास असून या कारवाईने या शंकेवर शिक्का मोर्तब झाला आहे.

भुसावळ शहरात महसुल व पोलिस प्रशासन अवैध वाळूवर सतत कारवाई करतात तरी देखील शेकडो ब्रास अवैध वाळू मिळून आल्याने या दोन्ही विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

आज ज्यांच्या ताब्यातून अवैध वाळू साठा जप्त केला गेला आहे. त्यात मांगीलाल गुजराथी, सुरेश खुशलानी, शिवराम कोळी, प्रदिप वाणी, चिंतामण कोळी, कृष्णा ठाकूर, सुकेश खुशलानी, सुरेश सहानी, रूपेश फालक, भुषण पाटील, मनिष जैन, संजय चौधरी, गायत्री शक्तीपीठाजवळ (नाव माहित नाही), पप्पु पाटील, पराग भोळे व कैलास महाजन यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com