भुसावळ @ 47.02

राज्यातील सर्वात ’हॉट’ सिटी!
भुसावळ @ 47.02

भुसावळ/जळगाव । jalgaon

या उन्हाळ्यातील सर्वाधिक 47.2 अंश तापमानाची (Temperature) नोंद सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात ही नोंद झाली असून भुसावळ (Bhusaval) राज्यात सर्वाधिक हॉट शहर (hottest city) ठरले आहे. दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे या परिसराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. उत्तरेकडून वेगाने वाहणार्‍या उष्ण वार्‍यामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप वाढला आहे. ‘मे हिट’चा तडाखा वाढत असल्याने सोमवारी जळगावचा पारा 45.8 तर भुसावळचा पारा 47.2 अंशावर नोंदविला गेला आहे. गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद भुसावळ शहरात झाली आहे.

उष्णतेच्या तीव्र झळांमुळे शहरासह जिल्ह्यात कर्फ्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च-एप्रिल महिन्यांपासून जिल्ह्यातील तापमानचा पारा चढताच असून 44 ते 45 अंशादरम्यान तापमानाची नोंद झालेली आहे. त्यानंतर अधून-मधून तापमानात चढ-उतार सुरुच होती. मात्र, दि.19 एप्रिल रोजी जळगाव, भुसावळचा पारा 45.6 अंशावर पोहोचला होता. तर वरणगाव, रावेर, फैजपूर, मुक्ताईनगर शहराचा पारा 46 डिग्री अंश सेल्सिअसवर आला होता.

आता ‘मे हीट’चा तडाखादेखील वाढत असल्याने दि.9 मे रोजी जळगावचे तापमान 45.8 तर भुसावळ 47.2 अंशावर सर्वाधिक नोंद झाली आहे.

भुसावळ-जळगाव हॉट सिटी

एप्रिल महिन्यात तापमानाच्या पार्‍यामध्ये चढ-उतार होऊन जिल्ह्यातील तापमान 43 ते 44 अंशावर स्थिरावले होते. मात्र, मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पार्‍याने पुन्हा मुसंडी मारली असून दि. 9 मे रोजी भुसावळचा पारा 47.2 अंशावर सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षात भुसावळ शहराने तापमानाचे रेकॉर्डब्रेक केला आहे. त्यामुळे भुसावळ-जळगाव हॉट सिटी झाली आहे.

ढगाळ वातावरणाचा लपंडाव (Bhusawal-Jalgaon Hot City)

सकाळी 10 वाजेपासूनच सूर्य जणू आग ओकत आहे. त्यामुळे दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचे चटके बसत असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले आहे. आज तापमानाच्या पार्‍यात अचानक वाढ झाल्याने भुसावळचे सर्वाधिक 47.2 अंशावर नोंद झाली आहे.

दरम्यान, दि. 9 मे रोजी दुपारी 1.15 ते 2.50वाजेदरम्यान चाळीसगाव वगळता जळगाव शहराने 45.8 डिग्रीचा पारा ओलांडला. मात्र, दुपारी 3 ते 4.15 वाजेदरम्यान ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरु असूनही काही ठिकाणी 2 ते 3 अंशाने तापमान वाढले आहे.

Related Stories

No stories found.