18 विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत प्रशासनाकडून बदल

मध्य रेल्वे : प्रवाशांनी बदल लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन
18 विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत प्रशासनाकडून बदल

भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :

रेलवे प्रशासनाकडून चालविण्यात येणार्‍या काही विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.प्रवाशांनी गाड्यांचा बदल लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासाने केले आहे.वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये -

गाडी क्र. 07379 डाउन वास्को दी गामा हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी मनमाड येथून दि. 2 ऑगस्ट पासून सकाळी 8 वाजता, भुसावळ 10.30 या स्टेशनच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

गाडी क्र. 07380 अप हजरत निजामुद्दीन - वास्को दी गामा क्लोन विशेष गाडी दि. 4 रोजी पासून भुसावळ येथे 4.55, मनमाड 7.25 वाजता.

गाडी क्र. 06523 डाउन यशवंतपुर - हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी दि. 30 पासून मनमाड 14.25, भुसावळ 5.10 वाजता.

गाडी क्र. 06523 अप हजरत निजामुद्दीन - यशवंतपुर क्लोन विशेष गाडी प्रस्थान स्टेशन दि.29 पासून मनमाड 3 वाजता.

गाडी क्र. 09065 डाउन सूरत छपरा क्लोन विशेष गाडी दि. 28 ऑगस्टपासून भुसावल दुपारी 1.10 वाजता.

गाडी क्र. 09066 अप छपरा - सूरत क्लोन विशेष गाडी दि. 30 पासून भुसावळ येथे 8.55 वाजता.

गाडी क्र.06528 अप नवी दिल्ली बेंगलूरु विशेष गाडी- दि. 28 पासून खंडवा येथे सकाळी 11 वाजता, भुसावळ 4.55 वा. जळगाव 13.13 वा, मनमाड 7.25 वाजता.

गाडी क्र. 06527 डाउन बेंगलूरु - नवी दिल्ली विशेष गाडी दि.28 पासून मनमाड दुपारी 2.45 वा. खंडवा 7.27 वा.

गाडी क्र. 09051 डाउन बलसाड मुजफ्फरपुर विशेष गाडी दि. 3आक्टोबर पासून जळगाव 3.15, भुसावळ 3.50वाजता.

गाडी क्र.02844 डाउन अहमदाबाद खुर्दा रोड विशेष गाडी जळगाव पहाटे 3.45, भुसावळ 4.10, मलकापुर 5.03, नांदुरा 05.28, अकोला 6.10 वा, बडनेरा 7.50 वाजता.

गाडी क्र 08402 डाउन ओखा खुर्दा रोड विशेष गाडी दि. 30 सप्टेंपर पासून जळगाव पहाटे 3.45, भुसावळ पहाटे 4.10, मलकापुर 5.03, शेगांव 5.50 वाजता, अकोला 6.10, बडनेरा सकाळी 7.50 वाजता.

गाडी क्र. 08406 डाउन अहमदाबाद भुबनेश्वर विशेष गाडी दि.2 आक्टोबरपासून जळगाव पहाटे 3.45, भुसावळ 4.10, मलकापुर 5.03, अकोला 6.10, बडनेरा 7.50 वाजता.

गाडी क्र. 02973 डाउन गांधीधाम खुर्दारोड विशेष गाडी दि. 30 पासून भुसावळ दुपारी 2.20 वाजता.

गाडी क्र. 02843 अप खुर्दा रोड- अहमदाबाद विशेष गाडी दि. 29 पासून.बडनेरा सायं 5 वाजता, भुसावळ रात्री 8.10, जळगाव 8.40 वाजता.

गाडी क्र. 08401 अप खुर्दा रोड- ओखा विशेष गाडी दि. 4 आक्टोबर पासून बडनेरा दुपारी 12.50, अकोला दुपारी 1.55, शेगांव 2.20, मलकापुर दुपारी 3, भुसावळ दुपारी 4 वा, जळगाव सायं.5, या स्टेशन च्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

गाडी क्र. 08405 अप भुवनेश्वर - अहमदाबाद विशेष गाडी स्टेशन दि. 30 पासून बडनेरा सायं 5 वा., मलकापुर 7.15 वा., भुसावळ रात्री 8.10 वा., जळगाव रात्री 8.40 वाजता.

गाडी क्र. 02974 अप खुर्दा रोड- गांधीधाम विशेष गाडी दि.3 पासून बडनेरा येथे सकाळी 9.57, अकोला दुपारी 12 वा., भुसावळ दुपारी 2 वाजता.

गाडी क्र. 02827 अप खुर्दा रोड- सूरत विशेष गाडी दि.3 आक्टोबर पासून भुसावळ येथे रात्री 8.10 वाजता, जळगाव रात्री 8.40 वाजता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com