Photo २८ कोटींच्या माता बालसंगोपन हॉस्पीटलचे लवकरच भूमिपुजन - ना.गुलाबराव पाटील

Photo २८ कोटींच्या माता बालसंगोपन हॉस्पीटलचे लवकरच भूमिपुजन - ना.गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना डिजीटल हेल्थ कार्डचे वाटप

जळगाव - प्रतिनिधी jalgaon

केंद्र व राज्य सरकारने (Central and State Governments) अनेक योजनांच्या माध्यमातून विविध विकारांवर (Free treatment) मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध केली असून याचा गोरगरीबांना लाभ होत आहे. सरकारने पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यावर देखील लक्ष केंद्रीत केले असून याचा सर्वसामान्यांना लाभ होत आहे. कोविड काळात अडचणी आल्या तरी संकटाला संधी मानल्याने (Civil Hospital) सिव्हील हॉस्पीटलचा कायापालट झालेला आहे. आता याच्याच आवारात २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असणारे माता - बालसंगोपन हॉस्पीटल उभारण्यात येत असून याचे लवकरच भूमिपुजन होणार असल्याची घोषणा (Guardian Minister Gulabrao Patil) पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली.

जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजीत करण्यात आलेले (Health camp) आरोग्य शिबिर आणि ( Digital Health Card) डिजीटल हेल्थ कार्ड वाटपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. आज जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य शिबिर आणि कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन (MLA Rajumama Bhole, Mayor Jayshritai Mahajan) आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक सिव्हील सर्जन डॉ.किरण पाटील यांनी केले. त्यांनी हॉस्पीटलमधील विविध सुविधांची माहिती देत जनतेने याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार राजूमामा भोळे यांनी आयुष्यमान भारत योजना कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केले.

तर महापौर जयश्रीताई महाजन यांनी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले असून आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात आल्याचे नमूद केले. आरोग्य सेवांची दशा आणि दिशा बदलण्यात आल्याचे महापौर म्हणाल्या.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांमधून विविध विकारांवर मोफत उपचार केले जात आहेत. सरकारने पायाभूत सुविधांसह इतर घटकांप्रमाणेच आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत केले आहे.

आपण कोणत्याही पदावर नसतांना रूग्णसेवा केली असून अनेकदा स्वत: रूग्णवाहिका चालवत सिव्हील हॉस्पीटलमध्ये पेशंटला दाखल केल्याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच आपल्या आजवरच्या वाटचालीत रूग्णसेवेचा मोठा लाभ झाल्याचेही ना.पाटील यांनी आवर्जून नमूद केले. पालकमंत्री पुढे म्हणाले की, आधीचे सिव्हील हॉस्पीटल आणि आजच्या हॉस्पीटलमध्ये मोठा फरक आहे. मध्यंतरी कोविड आल्यानंतर मोठी आपत्ती कोसळली. मात्र संकटाला संधी मानल्यामुळे येथे अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

सिव्हील हॉस्पीटलच्या आवारात प्रसूती झालेल्या माता आणि नवजात शिशूंसाठी २८ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद असणारे हॉस्पीटल सुरू होत असून याचे भूमीपुजन लवकरच होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर रूग्णांनी मिळालेल्या कार्डच्या मदतीने जिल्ह्यातील शासनाच्या यादीवर असणार्‍या ३८ हॉस्पीटल्समधून मोफत उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. सूत्रसंचाल मुकुंद गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पाटील यांनी केले.

Related Stories

No stories found.