भुलाबाई महोत्सव रंगणार छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात

महोत्सवाचे 24 रोजी आयोजन ; तीन गटात होणार स्पर्धा
भुलाबाई महोत्सव रंगणार छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केशवस्मृती प्रतिष्ठान (Keshavsmriti Pratishthan) संचालित ललित कला संवर्धिनीच्या (Lalit Kala Sanvardhini) माध्यमातून भुलाबाई महोत्सव (Bhulabai Festival) या नृत्यगीतांची (Dance competition) स्पर्धा गेल्या वीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे 21 वे वर्ष साजरे होत असून हा सोहळा दि. 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह (Chhatrapati Sambhaji Raje Theatre) येथे आयोजित करण्यात आला आहे.

भुलाबाई महोत्सव ही स्पर्धा तीन गटात होत असून प्रत्येक गटात 12 ते 15 मुलींची संख्या असते. यात भुलाबाईच्या गाण्यांना अग्रक्रम देण्यात येतो मात्र सध्याच्या चालू घडामोडींवर समाजोपयोगी संदेशाची पेरणी महिला करतात. अशा गाण्यांना प्राधान्य देवून भुलाबाई महोत्सव हा समाजप्रबोधनाचे एक व्यासपीठ म्हणून प्रस्थापित करण्यात प्रतिष्ठानला यश प्राप्त झाले आहे.

भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. आधुनिक युगात हा संवाद लोप पावत आहे आणि या लोकपरंपरेस उतरती कळा लागली आहे. अशा स्त्री केंद्रित उत्सवाचे महत्व जाणून स्व. डॉ. अविनाश आचार्य यांनी भूलाबाई महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. या निमित्ताने शाळा महाविद्यालय आणि खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते.

यात विजेत्यांच्या प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार असून सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येते. नाव नोंदणीसाठी रेवती कुरंभट्टी 9422209796 किंवा केशवस्मृती प्रतिष्ठान 273 नवी पेठ जळगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com