बीएचआर घोटाळा : २८ जणांचे जबाब नोंदविले

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कार्यवाही
बीएचआर घोटाळा : २८ जणांचे जबाब नोंदविले

जळगाव jalgaon

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी (BHR scam) दाखल गुन्ह्यात (Crimes) पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (Pune Economic Crimes Branch) पथकाने सोमवारी राजकीय क्षेत्रासह उद्योजक, निविदा भरणारे, ठेवीदार व इतर अशा २८ जणांचे जबाब (Replies) नोंदविले (recorded). १७ लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात हा आकडा १६६ कोटी ९८ लाखापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती देखील तितकीच मोठी असून गुन्ह्यात साक्षीदारांची यादी खूपच मोठी आहे. त्यामुळे जबाब नोंदविण्याचे हे काम बरेच दिवस चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.

डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात कर्मचार्‍यांची कारवाई सुरु आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वात चार जणांचे पथक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी जळगावात दाखल झालेले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या पथकाने २८ जणांचे जबाब नोंदविले होते. अजून काही दिवस जळगावात थांबून यातील साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले जाणार आहे. दरम्यान साक्षीदारांमध्ये राजकीय व उद्योजक अशा क्षेत्रातील बड्या नावांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.