बीएचआर घोटाळा : एजन्टस् आता रडारवर

कुठल्याही क्षणी होवू शकते अटक; विवेक ठाकरेचा जामिन अर्ज फेटाळला
बीएचआर घोटाळा : एजन्टस् आता रडारवर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्यातील ठेवी मिळवून देणारा एजन्ट विवेक ठाकरे याचा जामिन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे इतर सक्रिय असलेल्या एजन्टस्च्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात जे-जे एजन्टस् सहभागी असतील त्यांना कोणत्याही क्षणी पुणे आर्थीक गुन्हे पथक अटक केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बीएचआर प्रकरणात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पुणे डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संपुर्ण तांत्रिक पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, सुरज झंवर यांच्यासह संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायाधीश ए. ए. गोसावी यांच्या पुणे विशेष न्यायालयात काजकाज सुरु आहे. आज विवेक ठाकरे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सरकारपक्षाकडून युक्तीवाद करीत आक्षेप घेण्यात आला. यात ठाकरे यांनी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी त्यांना अमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडील ठेवी आपल्याकडे घेवून स्वत:चा आर्थीक फायदा करण्यासाठी ठाकरे याच्यासह सक्रीय असलेल्या एजन्टस्नी ठेवीदारांची फसवणूक केली. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचा युक्तीवाद अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी केल्यानंतर न्यायालयाने विवेक ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळला.

बीएचआर प्रकरणात ठेवी मिळवूण देण्यासाठी अनेक एजन्ट सक्रिय होते. यातील मुख्य असलेल्या विवेक ठाकरे याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शहरातील राजकीय पदाधिकार्‍यांसह एका नामांकित संस्थेचे पदाधिकारी देखील एजन्टस्च्या भूमिकेत काम करीत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत असल्याने त्यांना केव्हाही अटक केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पुणे आर्थीक गुन्हे पथक धडकणार

याप्रकरणी एका गुन्ह्यात पोलिसांकडून 5 संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे. यातच ठाकरे याचा जामिन अर्ज फेटाळल्याने पुढील 1-2 दिवसात पुणे आर्थीक गुन्हे शाखेचे पथक जळगावात येणार आहे. अन्य एजन्टस्ला अटक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

..तर अनेकांभोवतील कारवाईचा फास

बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनिल झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. या दोघांविरुद्ध सबळ पुरावे असून देखील पोलिसांकडून त्यांना अटक होत नाही. त्यांना अटक झाल्यास राज्यभरातील अनेक नेते-मंडळींभोवती कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com