भोंगऱ्या आया रे भाया,आमरू पिया आव लू रे भायाचालु, चालु रे भोगऱ्या,देखांन चालु खान्देशी

आदीवासी बांधवाच्या "भोंगऱ्या" सणास आजपासून सुरुवात
भोंगऱ्या आया रे भाया,आमरू पिया आव लू रे भायाचालु, चालु रे भोगऱ्या,देखांन चालु खान्देशी

दिलीप पालीवाल

लासुर Lasur ता.चोपडा वार्ताहर

संपुर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना (Tribal brothers) अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे भोंगऱ्या (Bhongarya) हा होय, वर्षभर काबाड कष्ट करुन भोंगऱ्या सणानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार, ह्या तीन जिल्हयातील आदिवासी बांधव एकत्र या सणानिमित्त (Festival) येत असतात.वाडया- वस्त्यांवर तरुण-तरुणीसह अबाल वृध्द ढोलला ताशांच्या तालावर ब बासरी च्या सुरांनी धुंद होऊन 'भोगऱ्या आया रे भाया,चालु ,चालू रे भोंगऱ्या देखांन चालु,अशी लोकगीते (Folk songs) सादर करतात, आणी भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटतात.

आदिवासी पावरा (Pavara) बांधवाना सर्वांत आवडता व मन उत्साहात करणारा सण म्हणजे भोंगऱ्या (Bhongarya) दिवाळीला जेवढे महत्व असते, तेवढेच आदिवासी बांधवामध्ये भोंग ऱ्या सणास महत्व असते.हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी, पाड्या, वस्त्यावर स्थानिक रहिवाश्यासह बाहेरगावी रहात असलेले पावरा बांधव एकत्र येतात व हा सण जल्लोषात (Jallosh) साजरा करतात. यंदाही मोठया प्रमाणात पावरा बांधव कुंडया पाणी , धानोरा, अडावद, येथे एकत्र येणार असुन भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा करणार असुन त्यामुळे वैभवशाली सातपुड्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे .

असा साजरा करतात भोंगऱ्या सण-

सर्व वाडया वस्त्यावरुन ढोल, घेवून आलेले आदिवासी पावरा बांधव सकाळी समाजाचे पाटील यांच्या घरी येवून गिणचरी देवीची (Goddess Ginchari) व ढोल , यांची पुजा करुण फेर घेऊन नृत्य करतात.व या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. तालुक्यात अनेक पाड्यावर व वस्त्यांवर भोंगऱ्या साजरा होत असल्याने त्याच्यासाठी लागणाऱ्या खादय वस्तु (Food item) खरेदीसाठी गजबज सुरु आहे . भोंगऱ्या निमित्त आलेल्या नातेवाईकांना व इष्ट मित्रमंडळींना भोंग्य ऱ्याची मिठाई म्हणुन हार, कंगण, गोडशेव, फुटाने, जिलेबी, आदी खादय पदार्थ भेट म्हणुन देतात.

या सणाला मुली आपल्या माहेरी आलेल्या नातेवाईकांना जेवण म्हणुन तुपामध्ये शेवाया, गुळ असे जेवन देतात, होळीपर्यंत चालणारा हा सण होळीनंतर दुसरया दिवशी मासांहार व त्याबरोबर येथे मद्यचा स्वाद घेऊन मन उत्साहीत करणारा आनंद लुटतात.

भोंगऱ्या सणाविषयी समज गैरसमज-

आदीवासी बांधवाच्या या सणाविषयी बहुतेक आपल्या लोंकामध्ये या भोंगऱ्या दिवसात आदिवासी मुले - मुलींना पळूवून नेतात, लग्न करतात , हा चुकीचा गैरसमज (Misunderstanding) आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या मागील महिण्याची पोर्णिमा ते येणाऱ्या होळीची पोर्णिमा या कालावधीला आदिवासी बांधवामध्ये तांडणपोह (Tandanpoh) म्हणजे तांड्याचा महिणा असे म्हटले जाते,त्यामुळे या कालावधीत महिनाभर कुणीही साखरपुडा विवाह, किंवा पळवून नेणे, हया प्रकारास आदिवासी पावरा समाज अशुभ मानतात म्हणुन हा गैरसमज आहे.एखादया वेळेस हा प्रकार घडला तर संस्कृती (Culture) मोडली त्यामुळे आदिवासीचीं जातपंचायत दंडवसुल करतात आणि त्याचबरोबर सामाजिक संघटना कार्यवाही देखील करतात.

असा असतो आदिवासाचा पेहराव-

या सणाला आदिवासी महिलाकडे जेवढे दागिने असतात तेवढे परिधान करून श्रुंगार (Makeup) करून भोंगऱ्यामध्यें नाच करित मंत्रमुग्ध होतात . मोठमोठे ढोल घेवून कमरेला कर दोडा ( चांदीचा ) बांधवा बाजुबंध, वाकला, पिजण्या असा महिलांचा पेहराव असतो, धोती ,टोपी, कुडता, कोट, रंग बी रंगी चष्मे , असा पुरुषांचा पेहराव (Attire) असतो . अश्या रितीने संपुर्ण आदीवासी बांधव एकत्र येवून गतशाली वैभव प्राप्त सातपुळ्याला पर्वांताला उत्साहीत करुण टाकतात, या वर्षी नवीन उमर्टी या ठिकाणी मोठा भोंगऱ्या बाजार (Bhongarya Bazaar) भरणार असल्याचेही समजते .

असा भरणार भोंगऱ्या बाजार-

दि. ११ शुक्रवार वरला ( मध्य प्रदेश ), दि. १२ मार्च शनिवार वैजापुर, रविवार कर्जाना सोमवार अडावद ( उनपदेव) मंगळवार किनगाव, बुधवार धवली ( मध्य प्रदेश ) शिरवेल, गुरुवार धानोरा, बलवाडी (मध्यप्रदेश) या ठिकाणी भोंगऱ्या बाजार (Bhongarya Bazaar) भरणार आहे दोन वर्षापासुन कोरोना संकट असल्यामुळे भोंगऱ्या बाजार भरत नव्हता मात्र यंदा मोठया उत्साहात भोंगऱ्या बाजारसाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com