भरधाव डंपरने दुचाकीला उडवीले ; महिला ठार

भरधाव डंपरने दुचाकीला उडवीले ; महिला ठार

नशिराबाद, ता.जळगाव - nashirabad

जळगाव-भुसावळ महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ डपर आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली.

डंपर क्र.एम.एच.वाय.७७७३ ने दुचाकीला जबर धडक दिली. यात एक महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी आहे. सदर मृत महिला ही कंडारी ता.भुसावळ येथील असल्याचे समजते. घटनास्थळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी श्री.साळुंखे यांचेसह पोलीस कर्मचारी आहेत. अपघातच होताच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून सदर ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com