भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे आज उद्घाटन

सागरपार्क मैदानावर सात दिवस रंगणार लोककलेचा जागर
भरारी फाऊंडेशनच्या बहिणाबाई महोत्सवाचे आज उद्घाटन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बचत गटातील (self help groups) महिलांना (women) आर्थिक विकासाच्या (Economic development) दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव (Bahinabai Mahotsava) भरारी फाउंडेशनतर्फे (Bharari Foundation) 18 ते 24 एप्रिलदरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित केलेला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन (inaugurated) उद्या दि. 18 रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.

फाउंडेशनतर्फे महोत्सव आयोजनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे. 18 एप्रिलला सायंकाळी साडेसहाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सागर पार्क मैदानावर उद्घाटन होईल. यावेळी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती अशोक जैन, रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, भरत अमळकर, डॉ. पी. आर. चौधरी, श्रीराम पाटील, कुशल गांधी, किशोर ढाके, जिल्हाधिकारी अभिजीत राउत , जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, प्रकल्प संचालक मिनल कुटे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव (nectar festival of independence) या आशयाचे प्रवेशद्वार याठिकाणी साकारण्यात आले आहे. या महोत्सवात जळगावसह खान्देशातील 260 बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी सांगितले.

महिलांसाठी पैठणीचा खेळ

18 एप्रिलला महिलांसाठी खेळ पैठणीचा (Game Paithani), रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर 19 एप्रिल शाहीर सुरेश जाधव यांचा शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम होईल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून विनोद ढगे काम पहात आहेत.

बहिणाबाई पुरस्कार जाहीर

डॉ. विलास भोळे (जळगाव), उज्ज्वला वर्मा ( सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. अनिता पाटील (क्रीडा प्रशिक्षक, जळगाव), डॉ. जितेंद्र पानपाटील ( सांस्कृतिक), खंडुराज गायकवाड (पत्रकारीता, मुंबई), स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान ( जळगाव), बहिणाबाई खान्देश युवारत्न पुरस्कार प्रा. हेमंत पाटील (जळगाव), नितीन वाघ ( जळगाव), आशिष खाचणे ( जळगाव), जगदीश चव्हाण (जळगाव), पल्लवी जाधव (जळगाव) यांना बहिणाबाई पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com