Video नारदाच्या गादीचा अवमान पडणार महागात

पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निलंबनासाठी वारकरी पुन्हा एकवटले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन
Video नारदाच्या गादीचा अवमान पडणार महागात

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon

चाळीसगाव येथे कीर्तन सुरु असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील (Police Inspector KK Patil) यांनी त्याठिकाणी जाऊन माईक बंद करत, वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवून, उपस्थित (Kirtan) किर्तनकार महाराजांसह वारकर्‍यांना दमबाजी केली. यामुळे संपूर्ण वारंवारी संप्रदायाच अवमान झाला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. के.के.पाटील यांच्या निलंबनाच्या मागणीने जोर पकडला आहे. आज (दि,९) पुन्हा (Collector's Office) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंकरी एकवटले, आणि भजन आंदोलन करत, के.के.पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. यासंबंधीचे निवेदनही जिल्हाधिकारी याना वारकर्‍यांतर्फे देण्यात आले. त्यामुळे आता के.के.पाटील यांना नारदाच्या गादीचा अवमान चांगलाच भोवणार असून त्यांच्यावर आता कारवाई टांगती तलवार लटकत आहे.

चाळीसगांव शहर (police) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी गेल्या २७ एप्रील रोजी शहरातील हनपुमानसिंग राजपूत नगरात सप्तश्रृंगी देवी मंदिर परीसरात सुरु असलेल्या किर्तन सोहळ्यात बुट घालून किर्तनकारांच्या व्यासपीठापर्यंन्त जाऊन यावेळी त्याठिकाणी असलेल्या मानाच्या नारदाच्या गादीवर बुटासकट पाय ठेवून नारदाच्या गादीचा अपमान केल्याच्या तिव्र भावना उमटल्या होत्या. तर याच वेळी किर्तन सोहळ्यातील मृदुंग वादक ह. भ. प. राम महाराज यांनाही धमकावल्याचा प्रकार त्यांनी केल्यानंतर या वृत्तीचे पडसान संपूर्ण राज्यात दिसून आले असतांनाच, या घटनेचा निषेध आणि पो. नि. के. के. पाटलांचे निलंबन करावे या मागणीसाठी ह. भ. प. जळकेकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ६ मे रोजी भजन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र जिल्ह्यात लागु असलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे हे आंदोलन तूर्त स्थगीत करण्यात आले होते. मात्र ९ मे रोजी संकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ह. भ. प. जळकेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भजन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात वारंकरी जमले होते. तसेच भाजपाचे आमदार राजूमामा भोळे यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. यासंबंधीचे निवेदनही जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून त्वरित कारवाईच मागणी करण्यात आली आहे. पुन्हा एकदा वारंकरी संप्रदाय एकवटल्याने, येणार्‍या काळात पो.नि.के.के.पाटील यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

चाळीसगावातून दोन निवदेन-

किर्तनात वारकरी संप्रदाय आणि जमलेल्या जनसामान्यांना धमकावल्या प्रकरणी दि,३० एप्रिल २०२२ रोजी ह. भ. प. राम महाराज यांनी पो. नि. के. के. पाटील यांच्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी व अप्पर पोलीस अधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यांचे समवेत विश्वहिंदू परीषद तसेच अन्य धार्मीक संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. तर राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे निषेध करण्यात येवून त्वरित निलंबन करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवदेनही राष्ट्रीय जन मंच (सेक्युलर )तर्फे आज दि,२९ एप्रिल २०२२ रोजी उपविभागीय पोलीस आधिकारी यांना देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.