
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात भूकंप (Earthquake in state politics) झाल्यानंतर त्याचे हादरे जळगाव जिल्ह्यालाही बसले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे (Shiv Sena MLAs )पाचोरा आणि पारोळा (Pachora and Parola) येथील आमदार सध्या ‘नॉट रिचेबल’ (currently 'not reachable') असल्याने त्यांचे समर्थक आणि पदाधिकारी हे बुचकळ्यात पडले आहे. दरम्यान या पदाधिकार्यांनी जोपर्यंत संपर्क होत नाही तोपर्यंत ‘वेट अॅण्ड वॉच’ (‘Weight and Watch’) अशी भूमिका घेतली आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आमदारांसह ‘नॉट रिचेबल’ झाले. ते थेट सुरत येथे एका हॉटेलात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक आमदारही असल्याची माहिती आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील आणि पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे दोन्ही नेते ‘नॉट रिचेबल’ असल्याने त्यांचे समर्थक मात्र चांगलेच बुचकळ्यात पडले आहे.
तरीही पक्षाशी गद्दारी - डॉ. हर्षल माने
पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील आणि पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील हे ‘नॉट रिचेबल’ असल्याचे समजले. या दोन्ही नेत्यांना शिवसेनेने भरभरून दिले आहे. आमदार चिमणराव पाटील यांना सहा वेळा संधी दिली आहे. ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक मानले जातात. मात्र असे असतांनाही पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व देऊन केलेली गद्दारी योग्य नाही अशी टिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना केली. दरम्यान कुणी कुठेही जावो आम्ही मात्र शिवसेनेसोबतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदेशाची वाट बघणार - रावसाहेब पाटील
पाचोरा-भडगावचे आमदार किशोरआप्पा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोपर्यंत त्यांच्याशी संपर्क होत नाही तोपर्यंत तरी काही सांगता येणार नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे देखिल संपर्क साधत आहेत. पुढील आदेशाची आम्ही वाट बघत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना दिली.
आ. चिमणआबा संपर्काचा प्रयत्न सुरू - वासुदेव पाटील
शिवसेना नेते आमदार चिमणराव पाटील यांच्याशी आम्ही पदाधिकारी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर नेमकी भूमिका काय? याबाबत चर्चा करू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे एरंडोल तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील यांनी दै. ‘देशदूत’शी बोलतांना दिली.
आमदारांच्या निवासस्थानासह कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत अनेक आमदारांना घेवून ते सुरत येथे गेले आहेत. दरम्यान, यात भाजपची रणनिती असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलाकडून आज दिवसभर भाजपचे आ. राजूमामा भोळे यांच्या कार्यालयाबाहेर व त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या घराला व कार्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.