तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनेचा फायदा

खरीप पिकांसाठी पाणी अर्ज करण्याचे आवाहन
तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनेचा फायदा

जळगाव - jalgaon-Dhule-Nandurbar

कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचे अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसुचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा फायदा घेणारे बागाईतदारांना...

दि.1 जुलै ते 10 ऑक्टोबर, 2020 या कालावधीकरीता सुरु होणाऱ्या खरीप हंगाम 2020 मध्ये भुसार, अन्नधान्न्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याची मंजुरी देण्याचे ठरले आहे.

तरी बागाईतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com