२० वर्षांनी भेटले जुने सवंगडी, शालेय जिवनातील आठवणींना उजाळा

ग.गो.बेंडाळे हायस्कुल मधील २००२-२००३ वर्षात १० वी.मध्ये असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
२००२-२००३ मध्ये इ.१० वी.मध्ये शिकत असलेले माजी विद्यार्थी
२००२-२००३ मध्ये इ.१० वी.मध्ये शिकत असलेले माजी विद्यार्थी

 रावेर - raver

शालेय जीवनातील (school life) आठवणी या खूप आनंद देणाऱ्या असतात,एकदा ती वेळ गेली कि,प्रत्येक जण आपआपल्या प्रपंचात रमबाण होतो. कधीतरी मात्र ते दिवस आठवतात, काही आठवणींनी जुन्या मित्रांना भेटण्याची हूर लागते. विवरा (ता.रावेर) येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलमधील (Bendale High School) २००२-२००३ मध्ये इ.१० मध्ये शिकणाऱ्या मुल-मुलांनी पुन्हा एकत्र येत गेट टु गेदर(स्नेह मेळावा)आयोजित करून ह्या आठवणी उजाळा दिला.शालेय जीवनातील संगती विविध ठिकाणी वास्तव्यास असूनही,या स्नेहमेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित झाले आणि त्यांचा तो दिवस विशेष संस्मरणीय ठरला.

येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलमधील २००२-२००३ मध्ये शिकत असलेले ३०-३५ जण दि.४ डिसे रोजी एकत्र जमले होते. हा मेळावा ग.गो.बेंडाळे हायस्कूलचे चेअरमन धनजी लढे यांच्या भाटखेडा रोडवरील शेतात घेण्यात आला होता. या मेळाव्यात खमंग अस्सल खान्देशी मेनू भरीत पुरीचा देखील अस्वाद उपस्थितांनी घेतला.२० वर्षांनी जुने मित्र मैत्रिणी जमा झाल्या असल्याने अनेक प्रसंग यावेळी मांडून त्या जीवनातील गोड कडू आठवणींना उजाळा दिला. याप्रंसगी आता शिक्षण घेत असलेल्या मुलांना अंतराळातील खगोलीय ज्ञानाला अधिक बळकटी मिळावी म्हणून अवकाशाचे निरीक्षणासाठी माजी विद्यार्थी योगेश भास्कर महाजन (जिरी) यांनी अत्याअधुनिक असा टेलिस्केप साहित्य देण्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमाला योगेश महाजन, योगेश सावंत, संजय इंगळे, हरिष तळेले, राहुल देशमुख, लता वानखेडे, पूर्वा कुलकर्णी, मेघा मानकरे, राहुल चौधरी, पंकज बखाल, शिल्पा तळेले, पंकज लढे, भारती मोहरकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com