पिंप्राळ्यात सासू-सुनेला मारहाण; रामानंद पोलिसात गुन्हा

जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद; जखमीला वैद्यकीय उपचाराठी दाखल
पिंप्राळ्यात सासू-सुनेला मारहाण; रामानंद पोलिसात गुन्हा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पिंप्राळा हुडको (Pimprala Hudko) परिसरात जुन्या वादातून (old argument) सासू-सुनेला (Mother-in-law beaten) मारहाण करून जखमी (wounded) केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोन जणांवर (two people) रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanandnagar Police Station) गुन्हा (crime) दाखल केला आहे.

पिंप्राळ्यात सासू-सुनेला मारहाण; रामानंद पोलिसात गुन्हा
अन्... आयुक्त डॉ.विद्या गायकवाड आल्या पावली परत गेल्या

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमलबाई दांडगे (वय-40, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) या महिला आपल्या सुनेसह वास्तव्याला आहे. दि. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणारा विनोद बिर्‍हाडे आणि अनिल बिर्‍हाडे दोघे रा. पिंप्राळा हुडको यांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच त्यांची सूनेला देखील मारहाण केली.

पिंप्राळ्यात सासू-सुनेला मारहाण; रामानंद पोलिसात गुन्हा
VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

जखमी सासू-सुनेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारात दाखल केले आहे. कमलबाई दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विनोद बिर्‍हाडे,अनिल बिर्‍हाडे यांच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.तपास पो.ना. बारेला करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com