राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाकडून महिलेचा विनयभंगासह मारहाण

पत्राचे शेड कापण्यावरुन वाद, चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाकडून महिलेचा विनयभंगासह मारहाण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील बस स्टॅन्ड समोर श्रीनाथ नावाची पाव वड्याची हॉटेल जवळ रोडवरील पत्राचे शेड कापले, ते का कापले असे विचारल्याच्या राग येवुन, चाळीसगाव न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम छगनराव देशमुख यांच्यासह चोघांंनी महिलेला मारहाण करुन, तिचा विनयभंग केल्याची घटना काल (दि,२६) घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

हिरापुर, रोड. सबस्टेशन जवळ राहणार्‍या ४० वर्षीय महिलेने चाळीसगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीतनूसार दिनांक २६-०५-२०२३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याना, त्यांच्या मामीनी फोन करून सांगीतले की, श्याम छगनराव देशमुख हे कटरच्या सह्याने आपल्या हॉटेलचे मागील शेडचे पत्रे कापत आहेत. म्हणुन महिला ह्या तातडीने आई व मामासह घटनास्थळी पोहचल्या, त्या ठिकाणी श्याम छगनराव देशमुख यांना महिलेने ‘ पत्राचे शेड का कापले असे विचारले असता, त्याचा राग आल्याने त्यानी शिवीगाळ करुन महिलेचे दोन्ही हात धरुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तसेच आई हीस देखील श्याम छगनराव देशमुख याने झटापटी करुन चापटा बुक्यांनी मारहान केली आहे. तसेच सचिन देशमुख व त्याच्या सोबत चार अनोळखी इसन नाव गाव माहीत नाही अशानी महिलेचे मामा याना देखील घरात घुसून लाथा बुक्यांनी मारहान करुन शिवीगाळ केल्याचेे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरुन श्याम छगनराव देशमुख, सचिन देशमुख रा. वाल्मीक नगर, चाळीसगाव त्यांचे सोबत चार अनोळखी इसन माव गाव माहीत नाही यांचे विरुध्द भादवी कलम ३५४, ३२३, ५०४, ४५२, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान श्याम देशमुख यांना देखील मारहाण झाल्याची चर्चा असून ते सद्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com