पाळीव कुत्रा मारल्याच्या कारणावरून मारहाण

परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल
पाळीव कुत्रा मारल्याच्या कारणावरून मारहाण

मुक्ताईनगर - Muktainagar

तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे पाळीव कुत्र्याला (pet dog) मारून टाकल्याच्या संशयावरून मारहाण केल्याप्रकरणी झालेल्या दंगलीत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या फिर्यादीत फिर्यादी मालताबाई सोपान धायडे (वय 52) रा. चिंचखेडा बुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी सविता उदय कुलकर्णी, दीक्षा उदय कुलकर्णी दोन्ही रा. चिंचखेडा (Chinchkheda) तसेच सागर गुलाबराव पाटील रा. महालखेडा ( Mahalkheda) व त्याचे सोबत 10 ते 15 साथीदारांनी दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादीने आपला कुत्रा (dog) मारून टाकला या संशयावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

यात तिचा मुलगा सतीश सोपान धायडे, सून पूजा धायडे, देरानी निर्मलाबाई समाधान धायडे व चुलत सून ज्योती जितेंद्र धायडे या सर्वांना जबर मारहाण केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात वरील चार आरोपींसह अज्ञात 15 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भाग-5 भादवि कलम 323 141 142 143 146 147 149 504 506 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद श्रीनाथ करत आहेत.

तर दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी सौ. सविता उदय कुलकर्णी (वय 50) व्यवसाय अंगणवाडीसेविका राहणार चिंचखेडा बुद्रुक हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांनी पाळलेला कुत्रा मयत झाल्याबाबत आरोपी सतीश सोपान धायडे यास बोलण्यास केल्याच्या कारणावरून आरोपी सतीश सोपान धायडे, पूजा सतीश धायडे, मालती सोपान धायडे, निर्मला समाधान धायडे, ज्योती जितेंद्र धायडे, देविदास कीटकुल धायडे, अतुल समाधान धायडे, जितेंद्र समाधान धायडे यांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली व या घटनेतील साक्षीदार सागर गुलाबराव धायडे यांच्या ताब्यातील मोटारसायकल (Motorcycle) क्रमांक एम. एच. 19 सी. क्यू. 4253चे तसेच साक्षीदार सतीश पाटील राहणार तिवळी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. 28 एबी 7872 असे दोन्ही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादवि कलम 141 ,142, 143, 146, 147 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक प्रदीप पिंगळे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com