तांत्रीक माहिती व जबाबरुन गुढ खूनाचा उलगडा

मेहुणबारे पोलिसांकडून खेडगाव शिवारातील खूनाचा यशस्वी तपास
तांत्रीक माहिती व जबाबरुन गुढ खूनाचा उलगडा

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील खेडगाव शिवारातील एका शेतातील विहिरीत दि,२३ /९/२०२१ रोजी सोमनाथ प्रभाकर पाटील रा.बोरखेड बु. यांचा मृतदेह आढळुन आला होता. सोमनाथ यांचा खूना झाल्याचा संशय त्यांच्या भावाने व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने मेहुणबारे पोलिसांना तांत्रीक बाबी तपासून व गोपनीय माहितीचे आधारे, सोमनाथ पाटील हा प्रविण ऊर्फ भिकन पाटील यांच्या मोटार सायंकलवर दि.२१/९/२०२१ रोजी बसून गेल्याचे उघड झाले.

प्रविण पाटील याचे पोलिसांनी वेळोवेळी जबाब घेतले. त्यांच्या जबाबमध्ये तफावत दिसून आल्यानतंर त्याला पोलिसांनी विश्‍वासात घेतल्यानतंर त्यांनी सोमनाथ हा दारुच्या नशेत असताना, दोघांमध्ये भांडण झाले. यात सोमनाथ याने प्रवीण याला अपमानस्पद वागणूक दिल्याने. याचा राग आल्याने, लाथ मारुन सोमनाथला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला प्रविण ऊर्फ भिकन पाटील व भटु वसंत सोनवणे यांच्या विरोध खूनाचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक पवन देसले, पोउपनि.हेमंत शिंदे, योगेश ढिकले, प्रकाश चव्हाण, पोना.प्रताप मथुरे, सिद्धांत शिसोदे, हनुमंद वाघेरे, गोरख चकोर, शैेलेश माळी, अरुण पाटील आदिच्या पथकाने आहोरात्र मेहनत घेवून केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com