जळगावात 20 तास चालली बाप्पाची विसर्जन मिरवणूक

पहाटे 7.30 वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन
 जळगावात 20 तास चालली बाप्पाची विसर्जन मिरवणूक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आपल्या लाडक्या बाप्पाला (Beloved Bappa) शुक्रवारी मोठ्या जल्लोषात व भक्तीमय वातावरणात (Farewell in a devotional atmosphere) निरोप दिला. शहरातून निघालेली सार्वजनिक मंडळांची मिरवणुक (Procession of public circles) तब्बल 20 तास सुरु होती. शनिवारी सकाळी 7.30 वाजता शेवटच्या मंडळाकडून गणरायाचे विसर्जन (Ganaraya's immersion) करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र गणरायाचे शांततेत विसर्जन झाले.

भक्तांना वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाला शुक्रवारी मोठ्या जल्लोषपुर्ण व भक्तीमय वातावरणात निरोप दिला. सार्वजनिक महामंडळातर्फे शहरातून भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता महानगरपालिकेपासून मानाच्या गणपतीची महाआरती करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्यान, तब्बल 20 तासा सुरु असलेली मिरवणुक सकाळी 7.30 वाजेपर्यंत सुरु होती. सकाळी शहरातील चिंतामणी मोरया मित्र मंडळातर्फे शेवटच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

179 सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन

अनंत चुतर्थीला जिल्ह्यात सर्वत्र लाडक्या बाप्पाचे शांततेत विसर्जन झाले. यावेळी शहरातील 179 सार्वजनिक मंडळांकडून गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला मोठ्या भक्तीमय वातावरणात निरोप दिला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com