पिंप्रीसेकमची केळी दुबईला रवाना

पारंपरिक शेतीला दिले प्राधान्य
पिंप्रीसेकमची केळी दुबईला रवाना

फेकरी,ता.भुसावळ । वार्ताहर Bhusaval

तालुक्यातील पिंप्रीसेकम (PimpriSecum) सारख्या ग्रामीण भागातून एका अभियंत्याने आपल्या शैक्षणिक विद्वतेतून आपल्या शेतीतील (Bananas) केळी (Dubai) दुबईला निर्यात केली.

जिल्ह्यात गल्लोगल्ली (Doctor, Engineer) डॉक्टर, इंजिनिअर असे उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात असून घेतलेल्या शिक्षण पात्रतेनुसार नोकरी मिळावी आणि त्यानुसार पगार मिळावा ही अपेक्षा ठेवतात. परंतु या सर्वांना आदर्श वाटेल अशी कामगिरी पिंप्रीसेकम येथील रहिवासी शेतकरी अभियंता निल गुर्जर यांनी वयाच्या 27 व्या वर्षी करून दाखवली आहे.

त्यांनी आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात न लागता आपल्या पारंपारिक शेतीला प्राधान्य देत त्यांच्या शैक्षणिक विद्वत्तेचा उपयोग शेतीसाठी केला आणि ओम केला एजन्सी (चिंचोली ता. मुक्ताईनगर) यांच्या सहाय्याने 26 च्या रासची 13 टन केळी दुबईला निर्यात केली असून मागच्या महिन्यात अशीच 20 टन केळी त्यांनी जम्मू-काश्मीरसाठी पाठवली होती.

याकामी त्यांना मंगलमूर्ती ग्रो चिंचोल, समर्थ ग्रो वरणगाव, आई कल्पना सरेश पाटील(गुर्जर), वडील सुरेश बाबुराव पाटील(गुर्जर), शिवलाल तायडे, भावेश चौधरी, दीपक वाढे, विजय तायडे, विष्णु तायडे, विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रथमच पिंप्रीसेकम सारख्या ग्रामीण भागातून एका उच्चशिक्षित अभियंताने पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन भरघोस उत्पन्न मिळवल्याने परिसरातून अभियंता निल गुर्जर यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.